Rajyasabha Election : सहाव्या जागेचा विषय संपला! शिवसेनेकडून संजय पवार यांचं नाव निश्चित

मुंबई तक

Rajyasabha Election राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून सुरू असलेल्या विविध चर्चांना अखेर शिवसेनेनं पूर्णविराम दिला आहे. संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब शिवसेनेचे मावळे आहेत. उद्धव ठाकरेंनी या मावळ्याला संधी दिली आहे असं संजय राऊत यांनी आज […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

Rajyasabha Election राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून सुरू असलेल्या विविध चर्चांना अखेर शिवसेनेनं पूर्णविराम दिला आहे. संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब शिवसेनेचे मावळे आहेत. उद्धव ठाकरेंनी या मावळ्याला संधी दिली आहे असं संजय राऊत यांनी आज जाहीर केलं आहे. अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल असं संजय राऊत यांनी सांगितलं. दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत, दोन्ही जागांवर शिवसेना लढणार आहे दोन्ही उमेदवार विजयी होतील.

कोल्हापूरचे संजय पवार हे अनेक वर्ष जिल्हाप्रमुख आहेत, कडवट शिवसैनिक आहेत. ते पक्के मावळे असून मावळे असतात म्हणून राजे असतात. पक्षनेते, पदाधिकारी हे मावळ्यांच्या जोरावर उभे असतात, असंही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Rajya Sabha Election: संभाजीराजे छत्रपतींची मोठी घोषणा, ‘या’ जागेवरुन अपक्ष लढणार!

हे वाचलं का?