Rave party : मुंबईजवळ जहाजावरील रेव्ह पार्टी उधळली! बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाचा समावेश
अंमली पदार्थांच्या विक्री आणि सेवनाविरोधात गेल्या काही दिवसांपासून मोहीम उघडलेल्या एनसीबीने (अंमली पदार्थ विरोध विभाग) शनिवारी मोठी कारवाई केली. मुंबईहून गोव्याला जात असलेल्या एका क्रूझ जहाजावरील रेव्ह पार्टीवर एनसीबीने धाड टाकली. या कारवाईत एका बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलासह 7-8 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून, मादक द्रव्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. मु्ंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलवरून […]
ADVERTISEMENT
अंमली पदार्थांच्या विक्री आणि सेवनाविरोधात गेल्या काही दिवसांपासून मोहीम उघडलेल्या एनसीबीने (अंमली पदार्थ विरोध विभाग) शनिवारी मोठी कारवाई केली. मुंबईहून गोव्याला जात असलेल्या एका क्रूझ जहाजावरील रेव्ह पार्टीवर एनसीबीने धाड टाकली. या कारवाईत एका बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलासह 7-8 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून, मादक द्रव्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मु्ंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलवरून गोव्याच्या दिशेनं निघालेल्या कॉर्डेलिया क्रूझ लाईनर एम्प्रेस जहाजावर रंगलेली रेव्ह पार्टी एनसीबीने उधळली. एसबीसीच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत जहाजावर कोकेन, चरस आणि एमडीएमए यासह विविध अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्टीत अनेक सेलिब्रेटी सहभागी झाल्याची माहिती असून, 7 ते 8 जणांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या कॉर्डेलिया क्रूझ लाइनर एम्प्रेस जहाजावर रेव्ह पार्टी होणार असल्याची गोपनीय माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर पथकाने धाड टाकत तीन चालणाऱ्या रेव्ह पार्टीचा डाव पहिल्याच दिवशी उधळून लावला.
हे वाचलं का?
एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. जहाजावर रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनसीबीचे अधिकारी प्रवाशांच्या वेशात जहाजावर दाखल झाले.
ADVERTISEMENT
सूत्रांनी ‘इंडिया टूडे’ला दिलेल्या माहितीनुसार जहाज मुंबईच्या समुद्री हद्दीतून बाहेर पडल्यानंतर आणि मध्य समुद्रावर पोहोचल्यावर रेव्ह पार्टी सुरु झाली. रेव्ह पार्टीला सुरूवात झाल्यानंतर प्रवाशांच्या वेशात असलेल्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत रेव्ह पार्टी उधळून लावली. यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अनेकांना अंमली पदार्थांचं सेवन करताना ताब्यात घेतलं.
ADVERTISEMENT
कॉर्डेलिया क्रूझ लाइनर एम्प्रेस जहाजावर अनेक तासांपासून ही कारवाई सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ही झाडाझडती पूर्ण झाल्यानंतर एम्प्रेस जहाज पुन्हा मुंबईतील मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलवर येथे आणण्यात येणार आहे.
Namascray Experience ने जहाजावर पार्टीचं आयोजन केल्याची माहिती समोर आली आहे. पार्टीत सहभागी होण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला 80 हजार रुपये शुल्क ठेवण्यात आलेलं होतं. ही पार्टी आजच सुरू झाली होती आणि 4 ऑक्टोबरला सर्वांना मुंबईत आणण्यात येणार होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT