RBI ची मोठी घोषणा : 1 डिसेंबरला लॉंच होणार रिटेल डिजिटल रुपयाची पहिली चाचणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी डिजिटल रुपयाबाबत एक मोठी घोषणा केली. येत्या 1 डिसेंबरपासून रिझर्व्ह बँक किरकोळ वापरासाठी डिजिटल रुपया (e₹-R) चा पहिला प्रायोगिक प्रकल्प सुरु करणार आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प सुरुवातीला काही निवडक ग्राहक आणि व्यापार्‍यांमध्येच लॉन्च केला जाणार आहे.

रिझर्व्ह बँकेने या प्रायोगिक प्रकल्पासाठी एकूण 8 बँकांची निवड केली आहे. टप्प्याने सर्वांचा या प्रकल्पात समावेश करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 4 बँकांच्या सहकार्याने 4 शहरांमध्ये या प्रायोगिक प्रकल्पाची सुरुवात करण्यात येणार आहे. या टप्प्यात मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू आणि भुवनेश्वर या चार शहरांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांच्या सहकार्यांने प्रकल्पाची सुरुवात होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात आणखी 4 बँकांचा समावेश केला जाणार आहे. यात बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, कोची, लखनौ, पाटणा आणि शिमलापर्यंत या प्रकल्पाचा विस्तार करण्यात येणार आहे. हळूहळू अधिक बँका, वापरकर्ते आणि शहरांचा समावेश करण्यासाठी या पथदर्शी प्रकल्पाची व्याप्ती वाढविली जाऊ शकते, असंही आरबीआयने आपल्या निवेदनात सांगितलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रिझर्व्ह बँकेच्या मते, डिजिटल रुपया (e₹-R) हे भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त डिजिटल टोकन असणार आहे. ज्या मूल्याची नाणी आणि नोटा छापल्या जातात त्याच मूल्याने ही डिजिटल टोकन जारी केली जातील. e₹-R मध्यस्थांमार्फत लोकांमध्ये वितरित केले जाणार आहेत आणि या मध्यस्थांमध्ये बँका मुख्य असतील. प्रकल्पामधील सहभागी सर्व बँका त्यांच्या ग्राहकांना डिजिटल वॉलेट देतील. वापरकर्ते या डिजिटल वॉलेटचा वापर करून e₹-R मध्ये व्यवहार करू शकतील आणि ते त्यांच्या मोबाईल फोन किंवा डिव्हाइसवर संग्रहित केले जातील.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT