ज्या चौकात गाडी फुटली, हल्ला झाला तिथंच उदय सामंत घेणार जाहीर सभा!
राकेश गुडेकर रत्नागिरी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काही दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर होते. पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांच्या मतदार संघात त्यांची जाहीर सभा झाली. या कार्यक्रमाला माजी मंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्याच दिवशी युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचीही कात्रज चौकात सभा होती. यावेळी उदय सामंत (Uday Samant) कात्रज चौकातून […]
ADVERTISEMENT
राकेश गुडेकर
ADVERTISEMENT
रत्नागिरी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काही दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर होते. पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांच्या मतदार संघात त्यांची जाहीर सभा झाली. या कार्यक्रमाला माजी मंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्याच दिवशी युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचीही कात्रज चौकात सभा होती. यावेळी उदय सामंत (Uday Samant) कात्रज चौकातून जात असताना त्यांची गाडी फोडण्यात आली, त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला.
आता पुण्यातील त्याच कात्रज चौकात उदय सामंत यांचा सत्कार होणार आहे. आणि त्याचबरोबर ते जाहीर सभा घेणार आहेत. मी आणि तानाजी सावंत आम्ही दोघंही तिथे जाहीर सभा घेणार असल्याचं उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं. तसेच मागून वार करण्यापेक्षा मी तारीख आणि वेळ देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हे वाचलं का?
शिवसेना-भाजप युती आगामी निवडणुका सोबत लढवेल
शिवसेना आणि भाजप युतीने भविष्यातील निवडणुका सोबत लढवणार आहे. शिवसेना ही भाजपबरोबर युती करत असताना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कुठच्या जागा कशा लढायच्या हे ठरवेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून खासदारकीपर्यंतच्या सर्व निवडणूका आम्ही शिवसेना – भाजप युती म्हणूनच लढणार असल्याचं सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं.
राणे-केसरकर वाद मनोरंजन म्हणून घ्यावा- उदय सामंत
मुख्यमंत्र्यांची दिल्ली वारी हा एक कामाचाच भाग असतो. यापूर्वी देखील राज्यातल्या कामांसाठी दिल्लीवारी करण्यात आलेली आहे असं सामंत म्हणाले. तर केसरकर आणि राणे हा वाद केवळ मनोरंजन म्हणून घ्यावा. दीपक केसरकर विरुद्ध राणे यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाकयुद्ध सुरु आहे त्यावर सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
मंत्रिमंडळ विस्तार दोन-तीन दिवसात होईल
मंत्रिमंडळ विस्तार हा येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये होईल, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते उदय सामंत यांनी दिली आहे. ते आज रत्नागिरीतील त्यांच्या पाली येथील निवासस्थानी बोलत होते. सचिवांच्या हाती कारभार दिला याचा अर्थ केवळ काही कामं रखडू नयेत हा आहे. विरोधकांनी टीका करणे हा लोकशाहीचा भाग आहे. कालच्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकनाथ शिंदे साहेब हे किती जमिनीवर आहेत हे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलं आहे असंही सामंत यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT