शिरसाटांना आता ‘शिंदे’शाहीचं आव्हान, आमदारकीही धोक्यात? भाजपचा डबल गेम?
औरंगाबादमधून भाजपने नवख्या अतुल सावेंना मंत्री केलं, पण जुन्या जाणत्या संजय शिरसाटांना मागेच राहावं लागलं. उलट आपल्याला ज्युनिअरपुढे सीनिअर नाही, तर आणखी ज्युनिअर व्हावं लागल्याची बोचणी शिरसाट वेळोवेळी बोलून दाखवतात. आता त्याच शिरसाटांच्या आमदारकीला भाजपनं आव्हान दिलंय. शिंदेशाहीच्या या मिशनमुळे शिरसाटांना पुढच्या निवडणुकीत तिकीट मिळणार की नाही, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेच्या तिकीटावर […]
ADVERTISEMENT

औरंगाबादमधून भाजपने नवख्या अतुल सावेंना मंत्री केलं, पण जुन्या जाणत्या संजय शिरसाटांना मागेच राहावं लागलं. उलट आपल्याला ज्युनिअरपुढे सीनिअर नाही, तर आणखी ज्युनिअर व्हावं लागल्याची बोचणी शिरसाट वेळोवेळी बोलून दाखवतात. आता त्याच शिरसाटांच्या आमदारकीला भाजपनं आव्हान दिलंय. शिंदेशाहीच्या या मिशनमुळे शिरसाटांना पुढच्या निवडणुकीत तिकीट मिळणार की नाही, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेच्या तिकीटावर हमखास निवडून येणाऱ्या शिरसाटांना शिंदे गटात गेल्यानंतर मंत्रिपदच नाही, तर आमदारकीलाही मुकावं लागेल का?
महाराष्ट्राची राजधानी आणि आमदारांची सर्वाधिक संख्या असलेल्या मुंबईतून शिंदे सरकारमध्ये मंत्री आहे, केवळ एक. तर मराठवाड्याच्या राजधानी तब्बल तीन जणांना मंत्रिपदाची संधी मिळालीये. पण ज्यांच्या मंत्रिपदाबद्दल सर्वाधिक चर्चा होती… निव्वळ चर्चाच नाही, तर मंत्रिपदही निश्चित झालं होतं, त्या संजय शिरसाटांना मात्र शपथ घेता आली नाही.
भाजपने औरंगाबाद शहरातून अतुल सावेंना कॅबिनेट मंत्री केलं. सावेंच्या मंत्रिपदामुळे शहरातली मंत्रिपदाची जागा आधीच अडलीये. त्यामुळे एकाच जिल्ह्यात, शहरात किती मंत्रिपदं देणार, ही गोष्ट शिरसाटांच्या मंत्रिपदाआड येत असल्याचं म्हटलं जातंय. औरंगाबादच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच भाजपचा आमदार मंत्री झालाय. म्हणजेच शिंदे गट सोबत आला असला, तरी सावेंना मंत्री करून भाजपनं औरंगाबाद ताब्यात घेण्याचं मिशन कायम असल्याचा स्पष्ट संदेश दिलाय.
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीपूर्वी; किती जणांना दिली जाणार शपथ?