विधानसभेत वादळी चर्चा, एका क्लिकवर दिवसभराचा घटनाक्रम जसा घडला तसा
मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनातील आजचा दिवस अक्षरश: वादळी ठरला आहे. कारण विधानसभेत मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणावरुन विरोधकांनी सरकारवर अतिशय आक्रमक पद्धतीने टीका केली. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी देखील डेलकर आणि अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणावरुन भाजपला सातत्याने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आजच्या दिवसाचं कामकाज प्रचंड गदारोळात पार पडलं. जाणून घ्या आज दिवसभरात विधानसभेत नेमकं काय-काय घडलं. (see […]
ADVERTISEMENT
मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनातील आजचा दिवस अक्षरश: वादळी ठरला आहे. कारण विधानसभेत मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणावरुन विरोधकांनी सरकारवर अतिशय आक्रमक पद्धतीने टीका केली. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी देखील डेलकर आणि अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणावरुन भाजपला सातत्याने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आजच्या दिवसाचं कामकाज प्रचंड गदारोळात पार पडलं. जाणून घ्या आज दिवसभरात विधानसभेत नेमकं काय-काय घडलं. (see what happened in the assembly all day 9 march 2021 long with one click)
ADVERTISEMENT
आज विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली. ज्यानंतर दिवसभर विधानसभेत याच एका प्रकरणाभोवती सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली.
मनसुख हिरेन मृत्यू: सचिन वाझेंना तात्काळ अटक करा – देवेंद्र फडणवीस
हे वाचलं का?
मनसुख हिरेन हत्ये प्रकरणी आज विधानसभेत पुन्हा एकदा गदारोळ पहायला मिळाला. राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली आहे. हिरेन यांच्या पत्नीने लिहीलेल्या पत्रातला मजकूर वाचून दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल चढवला.
‘या सभागृहामध्ये मनसुख हिरेन यांच्या मृत्यूसंदर्भातली बाब मी मांडली होती. माननीय मंत्रीमहोदयांनी यासंदर्भात सांगितलं यातला एक भाग NIA कडे गेला आहे आणि एक भाग ATS कडे तपासाला गेला आहे असं सांगितलं. पण मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी जो एफआयआर दाखल झाला आहे, त्याचसोबत त्यांच्या पत्नीने नोंदवलेला जवाबही महत्वाचा आहे. माझ्या पतीचा खून झाला असावा अशी मला खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा असा मला संशय आहे. म्हणून सदर घटनेबाबत सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई होण्याची विनंती आहे.’ त्यामुळे याप्रकरणी २०१ अंतर्गत पुरावे असताना सचिन वाझे यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी फडणवीसांनी सभागृहात केली.
ADVERTISEMENT
मनसुख हिरेन मृत्यू: सचिन वाझेंना तात्काळ अटक करा – देवेंद्र फडणवीस
ADVERTISEMENT
“मोहन डेलकरांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यांनाही अटक करा”
विधानसभेत मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याला उत्तर देत असताना परिवहन मंत्री अनिल परब आक्रमक झाले.
मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर मुंबईतल्या हॉटेलमध्ये सुसाईड नोटही सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांनाही अटक करण्यात यावी अशी मागणी अनिल परब यांनी केली. सचिन वाझे आणि मोहन डेलकर या दोन्ही प्रकरणांवरून विधानसभेत आज सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा गदारोळ पाहण्यास मिळाला. अनिल परब बोलत असताना विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. डेलकर यांची सुसाईड नोटही माझ्याकडे आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं. मात्र जी घोषणाबाजी आणि गदारोळ झाला त्यानंतर सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं आणि त्यानंतर अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं
“मोहन डेलकरांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यांनाही अटक करा”
हो मी मिळवला सीडीआर, ज्यांनी खून केला त्याची तर चौकशी करा: फडणवीस
मनसुख हिरेन यांच्या फोन कॉलचे डिटेल्स (सीडीआर) विरोधी पक्ष नेत्यांकडे आले कुठून असा प्रश्न काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपस्थित केल्यानंतर विधानसभेत एकच विरोधकांनी एकच गदारोळ केला. यालाच उत्तर देताना फडणवीसांनी सरकारवर देखील गंभीर आरोप केले आहेत. ‘गृहमंत्री माझी चौकशी करा, हो मी मिळवला सीडीआर… अरे ज्यांनी खून केला त्याची तर चौकशी करा, ज्यांनी खून केला त्याला पाठीशी घालता?’ असं म्हणत फडणवीसांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
हो मी मिळवला सीडीआर, ज्यांनी खून केला त्याची तर चौकशी करा: फडणवीस
गृहमंत्री सचिन वाझेंना हटवायला तयार होते, पण…
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सचिन वाझेंच्या सहभागाबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करत, पुरावे नष्ट केल्याच्या प्रकरणी वाझेंना अटक करण्याची मागणी केली. विरोधी पक्षांनी यानंतर सभागृहात सचिन वाझेंना निलंबीत करण्याची मागणी करत सभागृहात गदारोळ घातला. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात निवेदन देत या प्रकरणाचा तपास एटीएस करत असून सचिन वाझे यांचा या तपासाशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही अनिल देशमुखांनी स्पष्ट केलं.
परंतू गृहमंत्री अनिल देशमुख सचिन वाझेंना हटवण्यासाठी तयार होते. अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे मान्यही केलं होतं. परंतू यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतल्याचा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला.
गृहमंत्री सचिन वाझेंना हटवायला तयार होते, पण…
‘फडणवीस अडचणीत येतील म्हणून ते सचिन वाझेला टार्गेट करतायेत’
मनसुख हिरेन याच्या मृत्यूप्रकरणी विधानसभेत आज दिवसभर प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. याचेवळी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी एक गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, ‘विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येची केस दाबली. याच प्रकरणाची चौकशी सचिन वाझे हे करत आहेत. त्यामुळे फडणवीस हे अडचणीत येणार असल्यानेच ते वाझेंना टार्गेट करत आहेत.’ असं म्हणत भास्कर जाधवांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
‘2018 साली अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. तात्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबून टाकलं. हे सरकार जेव्हा आलं तेव्हा त्यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना पत्र दिलं की, माझ्या नवऱ्याने आणि सासूने आत्महत्या केली. पण देवेंद्र फडणवीस यांनी ते प्रकरण दाबलं आहे. असं त्यांनी म्हटलं आहे. त्याची चौकशी गृहमंत्र्यांनी सुरु केलेली आहे. ती चौकशी सचिन वाझे करत होते. त्या सचिन वाझेंकडे ती चौकशी राहू नये. ती चौकशी झाली तर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अडचणीत येतील म्हणून ते सचिन वाझेला टार्गेट करत आहेत. मंत्री महोदयांनी सचिन वाझेला काढायचं नाही. अजिबात काढायचं नाही. यांची चौकशी होईल म्हणून हे सगळं करत आहेत.’ असं भास्कर जाधव म्हणाले.
‘फडणवीस अडचणीत येतील म्हणून ते सचिन वाझेला टार्गेट करतायेत’
Mansukh Hiren प्रकरण ‘सरकार स्पॉन्सर्ड’ होतं का? फडणवीसांचा सवाल
मनसुख हिरेन प्रकरणात आज त्यांच्या पत्नीने दिलेला जबाब मी विधानसभेत वाचून दाखवला. सचिन वाझे यांनी माझ्या पतीची हत्या केल्याचा संशय आहे असं त्यांच्या पत्नीने आपल्या जबाबात म्हटलं आहे. तरीही सचिन वाझेंवर कोणतीही कारवाई केली जात नाहीये त्यांचं निलंबन तर सोडाच त्यांच्यावर काहीही कारवाई न करता त्यांना पाठिशी घालतं आहे त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरण हे सरकार स्पॉन्सर्ड आहे का? असा प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे सरकारवर टीका केली. या प्रकरणातलं सत्य बाहेर आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Mansukh Hiren प्रकरण ‘सरकार स्पॉन्सर्ड’ होतं का? फडणवीसांचा सवाल
…तर सचिन वाझेंवरही कारवाई करु, पाहा गृहमंत्री नेमकं काय म्हणाले!
‘मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणाचा संपूर्ण तपास एटीएस करत आहे. त्यामुळे आमचे जे विरोधक आहेत त्यांनी त्यांच्याकडे जे-जे पुरावे आणि कागदपत्रं आहेत ते एटीएसकडे द्यावेत. मग त्यात सचिन वाझे असो की, इतर कुणी… जो दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई केलीच जाईल.’ असं गृहमंत्री अनिल देशमुखांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
आज सचिन वाझेंच्या बाबतीत देखील काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या सगळ्याचा तपास एटीएस करत आहे. आमचे जे विरोधक आहे त्यांच्याकडे जे-जे पुरावे आणि कागदपत्र असतील ते त्यांनी एटीएसकडे द्यावे. मग त्यात सचिन वाझे असो की, इतर कुणी… त्याच्यावर कडक कारवाई केलीच जाईल.’ असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
…तर सचिन वाझेंवरही कारवाई करु, पाहा गृहमंत्री नेमकं काय म्हणाले!
त्यामुळे विधानसभेत आज संपूर्ण दिवस फक्त आणि फक्त सचिन वाझे यांच्यावरील कारवाई यावरच चर्चा पाहायला मिळाली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT