भोंगा प्रकरण: मोठी बातमी… राज ठाकरेंनी खंद्या समर्थकाला शहरप्रमुख पदावरुन हटवलं!
पुणे: पुण्यातील मनसेचे शहरप्रमुख आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांना शहरप्रमुख पदावरुन हटविण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुणे शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे वसंत मोरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी आज (6 एप्रिल) मनसेच्या […]
ADVERTISEMENT

पुणे: पुण्यातील मनसेचे शहरप्रमुख आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांना शहरप्रमुख पदावरुन हटविण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुणे शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे वसंत मोरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी आज (6 एप्रिल) मनसेच्या पुण्यातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना बोलविण्यात आलं होतं. पण या बैठकीला वसंत मोरे यांना निमंत्रित करण्यात आलं नव्हतं. याच बैठकीत बरीच खलबतं झाल्यानंतर राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना शहरप्रमुख पदावरुन हटवत त्याऐवजी साईनाथ बाबर यांची निवड केली.
मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवर याची माहिती देण्यात आली आहे. पाहा नेमकं काय म्हटलं आहे.
‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक श्री. साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी श्री. साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!’ अशी पोस्ट मनसे अधिकृत पेजवर टाकण्यात आली आहे.