संजय पांडे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; हेमंत नगराळेंची बदली
गेल्या आठवड्यात रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केल्यानंतर राज्य सरकारकडून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर हेमंत नगराळेंची संजय पांडे यांच्या जागेवर बदली करण्यात आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराजवळ एका गाडीमध्ये जिलेटीनच्या […]
ADVERTISEMENT
गेल्या आठवड्यात रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केल्यानंतर राज्य सरकारकडून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर हेमंत नगराळेंची संजय पांडे यांच्या जागेवर बदली करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराजवळ एका गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात सचिन वाझेला अटक झाल्यानंतर परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती.
परमबीर सिंग यांची बदली केल्यानंतर हेमंत नगराळे यांच्याकडे पोलीस आयुक्त पदाची सूत्रे सोपवण्यात आली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय पांडे यांची मुबईच्या पोलीस आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.
हे वाचलं का?
गृहविभागाने यासंदर्भातील आदेश काढले आहेत. सध्या मुंबई पोलीस आयुक्तपदी असलेल्या हेमंत नगराळे यांची संजय पांडे यांच्या जागेवर म्हणजेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Maharashtra DGP : रजनीश सेठ महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक, पदभार स्वीकारला
ADVERTISEMENT
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्यापूर्वी संजय पांडे यांच्याकडे राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाबरोबरच राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचाही अतिरिक्त पदभार होता. मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारने गेल्या आठवड्यात महासंचालकपदी रजनीश सेठ यांची पूर्णवेळ नियुक्ती केली. गेल्याच आठवड्यात संजय पांडे यांनी रजनीश सेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाची सूत्रे सोपवली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT