दोघांच्या संसारात रोज खडखडाट व्हायचा, तिघांचा संसार उत्तम चालला आहे-संजय राऊत
2019 ची विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडी त्यानंतर अस्तित्वात आलेलं सरकार हे महाराष्ट्र पुढची पन्नास वर्षे तरी विसरणार नाही. मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात उभा दावा निर्माण झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत हातमिळवणी करून शिवसेना सत्तेत आली. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. संजय राऊत आणि शरद पवार […]
ADVERTISEMENT

2019 ची विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडी त्यानंतर अस्तित्वात आलेलं सरकार हे महाराष्ट्र पुढची पन्नास वर्षे तरी विसरणार नाही. मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात उभा दावा निर्माण झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत हातमिळवणी करून शिवसेना सत्तेत आली.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. संजय राऊत आणि शरद पवार यांचा महाविकास आघाडी घडवण्यात सिंहाचा वाटा होता. आता संजय राऊत यांना तीन पक्षांबाबत विचारलं असता त्यांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं आहे.
लोकमतच्या डिजिटल इन्फ्लूअन्सर अवॉर्ड सोहळ्यात संजय राऊत यांना एक प्रश्न विचारण्यात आला. राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळलं तर शिवसेनेसमोर कोणता पर्याय असेल? असा तो प्रश्न होता. शिवसेना-राष्ट्रवादी, शिवसेना-काँग्रेस की शिवसेना-मनसे असे तीन पर्याय संजय राऊत यांना देण्यात आले. त्यावर संजय राऊत म्हणाले की, ‘सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. ही अवस्था बदलणार नाही. आमचा संसार बरा चालला आहे. संसार मोडू नये या मताचा मी आहे. आधी दोघांचा संसार होता त्यात रोज खडखडाट व्हायचा. आता तिघांचा संसार उत्तम चालला आहे. कुणाचाही दृष्ट लागू नये.’ असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.