अमित शाह-शरद पवार भेटीबाबत संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार यांच्यात भेट झाली की नाही हे मला ठाऊक नाही. मात्र देशाच्या गृहमंत्र्याना जर शरद पवार भेटले असतील तर त्यात गैर काय? त्यांना कुणीही भेटू शकतं. कोणत्याही कामासाठी अमित शाह यांना कुणीही भेटू शकतं. उद्या आम्हाला वाटलं तर आम्हीही त्यांना भेटू शकतो त्यात चुकीचं काय? असा प्रश्न संजय राऊत […]
ADVERTISEMENT

देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार यांच्यात भेट झाली की नाही हे मला ठाऊक नाही. मात्र देशाच्या गृहमंत्र्याना जर शरद पवार भेटले असतील तर त्यात गैर काय? त्यांना कुणीही भेटू शकतं. कोणत्याही कामासाठी अमित शाह यांना कुणीही भेटू शकतं. उद्या आम्हाला वाटलं तर आम्हीही त्यांना भेटू शकतो त्यात चुकीचं काय? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. अमित शाह यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की सगळ्याच गोष्टी उघड करत नसतात. अमित शाह हे बोलले ते योग्य असेलही.. पण बंद दरवाजाच्या आड झालेल्या गोष्टी नंतर बाहेर आल्याच होत्या. अशा बैठका झाल्या तर त्या काही गुप्त राहणार नाहीत असं म्हणत संजय राऊत यांनी टोला लगावला.
शरद पवार, प्रफुल पटेल अहमदाबादमध्ये कोणाला भेटले?
विरोधकांनी आरोपांचे रंग उधळू नयेत
विरोधकांनी उगाच आरोपांचे रंग उधळू नयेत. गेल्या काही दिवसांमध्ये जे काही आरोप भाजपने केलं आहे त्यामुळे राज्याची बदनामी होते आणि वाईट वाटतं. धुळवडीच्या दिवशी एवढंच सांगेन की की विरोधकांनी उगाच असे आरोप करू नयेत. मागील काही दिवसात झालेल्या घडामोडींमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. विरोधकांना कोणताच रंग नाही ते बेरंग आहेत त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत प्रेमाची होळी खेळावी. उठसूठ आरोपांचे रंग उडवू नये. महाराष्ट्राचं सरकार पडणार नाही, कुणीही तंगड्यात तंगडं अडकवू नयेत. महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.