आर्यनला भेटून शाहरुख खान तुरुंगातून बाहेर आला अन् चाहत्यांकडे पाहून…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा आज (21 ऑक्टोबर) मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये गेला होता. दरम्यान त्याचे अनेक व्हीडिओ आणि फोटो हे सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत. यासोबतच शाहरुख खानचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो आपल्या मुलाला भेटल्यानंतर तुरुंगातून बाहेर येत आहे. तेव्हा एक चाहता त्याच्यासमोर हात जोडतो. त्याचवेळी शाहरुखही त्याला हात जोडून नमस्कार करताना दिसत आहे.

ADVERTISEMENT

चाहते करत आहेत शाहरुखचं कौतुक

शाहरुखचा हे वागणं पाहून चाहते त्याला खूपच आदर देत आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की, अशा कठीण काळातही शाहरुख किती सहजपणे आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देत आहे. एका चाहत्याने असं ट्विट केलं आहे की, ‘शाहरुख खान कोण आहे हे सगळ्यांना सांगण्यासाठी फक्त काही सेकंद पुरेसे आहेत? अशा कठीण काळातही तो आपल्या चाहत्यांना किती आदर देत आहे, वाह.’

हे वाचलं का?

आणखी एका चाहत्याने असं म्हटलं आहे की, ‘या व्यक्तीमध्ये काय ग्रेस आहे. संपूर्ण यंत्रणा त्याला तोडण्यासाठी सज्ज आहे. प्रत्येकाने त्याच्यासारखे व्हायला हवे. शाहरुख खान हाच खरा माणूस आहे.”

तर आणखी एका चाहत्याने असं म्हटलं आहे की, ‘कठीण काळात लोक इतरांकडे दुर्लक्ष करतात. शाहरुख खान सौम्य आणि एक चांगला स्वभावाचा माणूस आहे. हे शाहरुखचा स्टँडर्ड आणि आपलेपणा आहे.’

ADVERTISEMENT

शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) क्रूझ शिपच्या रेव्ह पार्टीतून 2 ऑक्टोबरच्या रात्री ताब्यात घेतलं होतं. त्यांच्यासोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही अटक करण्यात आली. यापैकी महिला आरोपी सोडून सगळे आरोपी सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत.

ADVERTISEMENT

मला आशा आहे की माझा मुलगा लवकर घरी येईल; शाहरुखचा NCB अधिकाऱ्यांशी संवाद

दरम्यान, आर्यन खानसह तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र, आर्यन खानचे वकील सतीश मनेशिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी संपूर्ण तपशिलासह जामीन अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यावर देखील हायकोर्टात तात्काळ सुनावणी होणार नसल्याने आर्यनला अद्यापही तुरुंगातच राहावं लागणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT