दीपक केसरकरांच्या आरोपावर शरद पवारांचं एका वाक्यात प्रत्युत्तर, म्हणाले महत्त्व…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे

ADVERTISEMENT

नागपूर: एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आरोप केला होता की शरद पवार यांनी तीनवेळा शिवसेना फोडली. याला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे ते म्हणाले ‘महत्व द्यावं असं हे वक्तव्य नाही’. आज शरद पवार (Sharad Pawar) नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थीत होते. त्यावेळी पवारांनी देशातील आणि राज्यातील चालू घडामोडीवर आणि संघटना बळकट करण्यावर भाष्य केले.

‘सभागृहात म्हणणे मांडण्याचा अधिकार काढून घेतला’.

केंद्र सरकारने सभागृहात आंदोलन न करण्याचा घेतलेला निर्णय लोकशाहीसाठी हानीकारक असल्याचे पवार म्हणाले. ”सभागृहात मागणी मान्य झाली नाही तर लोग सभात्याग करतात, मग बाहेर महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी जाऊन शांतपणे निदर्शने करतात, शांतपणे आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार काढून घेतला आहे, उद्या आम्ही बैठकीत ह्यावर चर्चा करू आणि हा प्रश्न कसा उचलायचा ते ठरवू असेही शरद पवार म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

आगामी निवडणुका एकत्र लढणार?

महाविकास आघाडी आगामी महापालिका निवडणुका एकत्र लढणार का? यावर अजून एकमत होऊ झालेले नाही. त्यावर शरद पवार म्हणाले ”जर काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना एकत्र लढले तर लोकांना त्यांच्या मनासारखे मतदान करता येईल. मला असं वाटतं पण आम्हाला बैठका कराव्या लागतील”. राज्यातील परिस्थितीवरतीही शरद पवारांनी आपले म्हणणे मांडले. ते म्हणाले की पूर परिस्थिती आहे, प्रशासन ठप्प आहे. दोघंच जण असल्याने हे नुकसानदायक आहे.

‘संजय राऊतांना दोघांची कुवत माहित आहे.’

नागपूरच्या काटोल मतदार संघातून आमदार असलेले अनिल देशमुख सध्या जेलची हवा खात आहेत. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले ”कोर्टावर मी बोलणार नाही. पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय जास्त काळ जामिन न देता ठेवणे ही बाब योग्य नाही. संजय राऊत हे म्हणाले की शिंदे सी एम नाहीच, खरे सी एम फडणावीसच – ह्यावर पवार म्हणाले त्यांनी दोघांबरोबर काम केलेले आहे, त्यामुळे त्यांना कोणाची काय कुवत आहे ते माहिती आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT