Pandharinath Amberkar : शशिकांत वारिशे मृत्यू, अटकेत असलेले आंबेरकर कोण?
Pandharinath Amberkar Arrested in Shashikant Warishe Death Case : ‘मुख्यमंत्री शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री फडणवीसजी महोदय, आपल्यासोबत कुणाचे फोटो? शहानिशा कराच…; पंतप्रधान मोदीजींसह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ‘बॅनर’वर गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे फोटो, रिफायनरी विरोधी शेतकऱ्यांचा सनसनाटी आरोप’ अशा मथळ्या खाली महानगरी टाइम्स या स्थानिक वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर काही तासांत पत्रकार शशिकांत वारिशे यांचा […]
ADVERTISEMENT

Pandharinath Amberkar Arrested in Shashikant Warishe Death Case : ‘मुख्यमंत्री शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री फडणवीसजी महोदय, आपल्यासोबत कुणाचे फोटो? शहानिशा कराच…; पंतप्रधान मोदीजींसह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ‘बॅनर’वर गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे फोटो, रिफायनरी विरोधी शेतकऱ्यांचा सनसनाटी आरोप’ अशा मथळ्या खाली महानगरी टाइम्स या स्थानिक वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर काही तासांत पत्रकार शशिकांत वारिशे यांचा अपघाती मृत्यू झाला. ज्या गाडीच्या धडकेत वारिशेंचा मृत्यू झाला ती थार गाडी होती पंढरीनाथ आंबेरकर याची! ही हत्या असल्याचा आरोप झाला आणि वाढत्या दबावानंतर आंबेरकरला पोलिसांनी अटक केली. आंबेरकर कोण आहेत? हेच समजून घ्या…
6 फेब्रुवारी 2023 रोजी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर 4 ते 5 तासांनी शशिकांत वारिशे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू अपघाती झालेला नसून, ही ठरवून करण्यात आलेली हत्या असल्याचा आरोप होत आहे. रिफानरी विरोधी शेतकऱ्यांसह राज्यभरातील पत्रकार संघटनांनी निषेध नोंदवत या प्रकरणाच्या चौकशी मागणी केली.
इतकंच नाही, तर ज्या गाडीने शशिकांत वारिशे यांना धडक दिली, ती पंढरीनाथ आंबेरकर यांची होती. शशिकांत वारिशेंच्या हत्येमागे आंबेरकर हे असल्याचा आरोप झाला आणि प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी पंढरीनाथ आंबेरकर यांना अटक केलीये. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.