Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीने शेअर केलेला ‘हा’ व्हीडिओ होतोय तुफान व्हायरल

मुंबई तक

मुंबई: फिटनेस फ्रिक बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही आपल्या आयुष्यात फिटनेसला किती महत्त्व देते हे आता कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. शिल्पा ही योगा प्रेमी आहे आणि योगा करताना तिचे व्हिडीओ आणि फोटो ती नेहमी आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करते. आता एका नवीन व्हीडिओमध्ये शिल्पा तिच्या दोन्ही मुलांसोबत योगा करताना दिसत आहे. इंटरनेटवर शिल्पाच्या मुलांचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: फिटनेस फ्रिक बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही आपल्या आयुष्यात फिटनेसला किती महत्त्व देते हे आता कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. शिल्पा ही योगा प्रेमी आहे आणि योगा करताना तिचे व्हिडीओ आणि फोटो ती नेहमी आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करते. आता एका नवीन व्हीडिओमध्ये शिल्पा तिच्या दोन्ही मुलांसोबत योगा करताना दिसत आहे.

इंटरनेटवर शिल्पाच्या मुलांचा व्हीडिओ व्हायरल

शिल्पा शेट्टीने तिचा मुलगा वियान आणि मुलगी समीशाचा एक व्हीडिओ तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये शिल्पाची दोन्ही मुले योग करताना दिसत आहेत. शिल्पा शेट्टी स्वतः व्हीडिओमध्ये दिसत नाही, पण तिचा आवाज व्हीडिओमध्ये ऐकू येतो. शिल्पा तिच्या दोन्ही मुलांना योग करायला शिकवत आहे. व्हीडिओमध्ये विआन आपल्या लहान बहिणीला योगासने करायला शिकवताना दिसत आहे.

शिल्पा शेट्टीच्या मुलांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिल्पाच्या दोन्ही मुलांचा समजूतदारपणा आणि एकमेकांबाबत असलेलं बाँडिंग याचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. अवघ्या 3 तासात शिल्पाच्या मुलांच्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp