उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे : शिवसेनेतील फुटीवर सर्वोच्च न्यायालयात आज काय होणार?
राज्यात नवं सरकार आलं असलं, तरी राजकीय पेच सुटलेला नाही. आमदारांच्या निलंबनापासून ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयाला देण्यात आलेलं आव्हान, अशा अनेक याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या पीठासमोर सुनावणी होणार असून, न्यायालय नेमकं काय दिशानिर्देश देणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं […]
ADVERTISEMENT

राज्यात नवं सरकार आलं असलं, तरी राजकीय पेच सुटलेला नाही. आमदारांच्या निलंबनापासून ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयाला देण्यात आलेलं आव्हान, अशा अनेक याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या पीठासमोर सुनावणी होणार असून, न्यायालय नेमकं काय दिशानिर्देश देणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा हे शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर या प्रकरणात याचिकांची संख्या वाढत गेली.
शिवसेनेच्या वतीने आणि शिंदे गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. यात केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती देण्याच्या, तसेच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदार राहुल शेवाळे यांची गटनेते पदी केलेली नियुक्ती, तसेच भावना गवळींना प्रतोदपदी नियुक्त केल्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांचाही समावेश आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेंचा गट असा सुप्रीम कोर्टात सामना
आम्ही शिवसेना सोडलेली नाही, असा दावा शिंदे गटाकडून ४० आमदारांना १५ आमदारांचा गट अपात्र ठरवू शकत नाही, अशी भूमिका शिंदे गटाने यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडलेली आहे. राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टानुसार शिंदे गटातील आमदारांनी इतर पक्षात विलीनीकरण न केल्याने त्यांना अपात्र ठरवावं, अशी मागणी शिवसेनेने केलेली आहे.