शिंदे गट महाराष्ट्राला कोणता ‘पिक्चर’ दाखवण्याच्या तयारीत?; राड्यावर ‘सामना’त काय म्हटलंय?
बंडखोरी करून मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदेसह शिंदे गटातील आमदारांना शिवसेना ‘सामना’तून सातत्यानं लक्ष्य करत आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर राडा झाला. यावरून आता शिवसेनेनं शिंदे गटावर टीकेचे बाण डागले आहेत. भरत गोगावले यांनी केलेल्या विधानावरही शिवसेनेनं बोट ठेवलं असून, गुवाहाटीफेम सिनेमा महाराष्ट्र डब्यात घालेल, असा इशारा दिला आहे. शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदेंसह ४० आमदार […]
ADVERTISEMENT

बंडखोरी करून मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदेसह शिंदे गटातील आमदारांना शिवसेना ‘सामना’तून सातत्यानं लक्ष्य करत आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर राडा झाला. यावरून आता शिवसेनेनं शिंदे गटावर टीकेचे बाण डागले आहेत. भरत गोगावले यांनी केलेल्या विधानावरही शिवसेनेनं बोट ठेवलं असून, गुवाहाटीफेम सिनेमा महाराष्ट्र डब्यात घालेल, असा इशारा दिला आहे.
शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदेंसह ४० आमदार गुवाहाटीला गेले होते. त्यावरूनच पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेनेसह महाविकास आघाडीतील आमदार त्यांच्याविरुद्ध ५० खोके एकदम ओके, ताट-वाटी चलो गुवाहाटी, ५० खोके खाऊन खाऊन माजलेत बोके, अशी घोषणाबाजी केली जातेय. त्यातूनच बुधवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राडा झाला.
या राड्यावर भाष्य करताना शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाष्य करताना म्हटलंय की, “विश्वासघात करून जन्माला आलेलं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आल्यापासून सनदशीर मार्गाने कारभार चालवण्यापेक्षा धमक्या व मारहाणीसारखे गुंडगिरीचे प्रकार अंमळ अधिकच वाढले आहेत. बुधवारी विधिमंडळाच्या आवारातही नेमके हेच घडले. सत्तारूढ व विरोधी आमदारांमध्ये अभूतपूर्व धुमश्चक्री झाली. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आधी घोषणायुद्ध झाले व त्याचे पर्यवसान आधी हमरीतुमरी आणि नंतर धक्काबुक्कीमध्ये झाले. विधिमंडळाच्या आवारात आजवर कधीही घडली नाही अशी ही लाजिरवाणी घटना साऱ्या महाराष्ट्राने पाहिली.”
सुप्रिया सुळेंनी शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची थेट अमित शाहांकडे केली तक्रार