‘सत्ताधाऱ्यांचे संस्कार आणि वैचारिक लायकी दिसली;’ सुषमा अंधारेंनी आदित्य ठाकरेंच्या पोस्टर्सवरून बरंच सुनावलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं. या न्यायाने ज्या सत्ताधाऱ्यांची स्वतःची दिशा चुकलेली असताना इतरांची दिशा चुकलेली आहे, असं म्हणणं हस्यास्पद आहे.’ असा खोचक टोला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना लगावला आहे. शिंदे गटाने गुरुवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी बॅनर झळकावले. ‘महाराष्ट्राचे परम पूज्य (पपू) युवराज’, युवराजची कायमच दिशा चुकलेली, असा मजकूर असलेल्या बॅनरवर आदित्य ठाकरे आणि मातोश्रीवर टीका करण्यात आलीये.

ADVERTISEMENT

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं. या न्यायाने ज्या सत्ताधाऱ्यांची स्वतःची दिशा चुकलेली असताना इतरांची दिशा चुकलेली आहे, असं म्हणणं हस्यास्पद आहे. चोर ते चोर वरून शिरजोर ही म्हण अशाच प्रवृत्तीच्या लोकांचं वागणं-बोलणं बघून रूढ झालेली असणार, असा टोला अंधारेंनी लगावला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज जी पोस्टर्सबाजी झाली, ती विधिमंडळाच्या गौरवशाली परंपरेला गालबोट लावणारी आहेच सोबतच यातून सत्ताधाऱ्यांचे संस्कार आणि वैचारिक लायकी दिसून आली, असा निशाणा सुषमा अंधारेंनी साधला.

हे वाचलं का?

सत्ताधारी सभागृहात प्रश्न सोडवण्यासाठी असतात. मात्र पायऱ्यांवरती तेच आंदोलनं आणि घोषणाबाजी करत असतील तर महाराष्ट्राच्या जनतेने न्याय कुणाकडे मागायचा? असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला. या सगळ्या गलिच्छ राजकारणामागे सूत्रधार असणारे देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे की आपण जी पाताळयंत्री राजकारण करत आहात. जी हुल्लडबाजी महाराष्ट्रामध्ये चालवली आहे, ती महाराष्ट्राची जनता ओळखून आहे. यावरून आपल्याला लोकांच्या प्रश्नांशी किती देणंघेणं आहे, यावर लोक विचार करत आहेत, अशी टीका त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली.

शिंदे गटाच्या बॅनरवर आदित्य ठाकरेंबद्दल काय म्हटलंय?

ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे परम पूज्य (पपू) युवराज

ADVERTISEMENT

२०१४ ला १५१ चा हट्ट धरून युती बुडवली,

२०१९ ला खुर्चीसाठी हिंदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली.

पर्यटन खाते घेऊन घरातच बसून केला कहर,

सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर.

पुन्हा निवडणूक लढवायची देतात ठसन,

स्वतः आमदार व्हायला महापौर व दोन एमएलसीचे लागते कुशन.

खुर्चीत बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार,

सत्ता गेल्यावर आता फिरतात दारोदार.

तुमच्या या खोट्या रडगाण्यावर भुलणार नाही,

युवराजांची कायमच दिशा चुकली.

असं शिंदे गटाकडून झळकावण्यात आलेल्या बॅनरवर लिहिलेलं आहे. त्याचबरोबर शिंदे गटाकडून मातोश्रीवर पैसे खाल्याचा आरोप करणाऱ्या घोषणाही करण्यात आल्या. ‘सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके’ ‘अनिल देशमुखचे खोके, मातोश्री ओके’, ‘नवाब मलिकचे खोके, मातोश्री ओके’, अशा घोषणा शिंदे गटाच्या आमदारांकडून करण्यात आला.

शिंदे गटाला आदित्य ठाकरेंना पप्पू म्हणायचं का?

बॅनरवर आदित्य ठाकरेंना घोड्यावर दाखवण्यात आलंय. त्याचबरोबर परमपूज्य म्हणतानाच कंसात पपू असं म्हटलेलं आहे. बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा पप्पू असा उल्लेख केलेला आहे, असा प्रश्न शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांना मुंबई Tak च्या प्रतिनिधींकडून विचारण्यात आला.

त्याला उत्तर देताना भरत गोगावले म्हणाले, कुठे उल्लेख केला आहे? तुम्ही ऐकलंत का? त्यावर बॅनरवरील मजकूराकडे गोगावलेंचं लक्ष वेधलं. भारत गोगावले म्हणाले, ‘बॅनरवर ते लिहिलेलं आहे. त्याच्यातून तुम्हाला काय अर्थ लावायचा तो लावा”, असं भरत गोगावले यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT