पुण्यातील धक्कादायक घटना, आयसीयूमध्ये कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या
पुणे: पुण्यालगतच्या (Pune) तळेगाव मावळ (Talegaon Maval) परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये MIMER रूग्णालयात दाखल केलेल्या 44 वर्षीय कोरोनाबाधित रूग्णाने (Corona Paitent) उपचारादरम्यान आयसीयूमध्ये (ICU) गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या 44 वर्षीय रुग्णाचं नाव सोमनाथ हुलवले असल्याचं समजतं आहे. या घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस […]
ADVERTISEMENT
पुणे: पुण्यालगतच्या (Pune) तळेगाव मावळ (Talegaon Maval) परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये MIMER रूग्णालयात दाखल केलेल्या 44 वर्षीय कोरोनाबाधित रूग्णाने (Corona Paitent) उपचारादरम्यान आयसीयूमध्ये (ICU) गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या 44 वर्षीय रुग्णाचं नाव सोमनाथ हुलवले असल्याचं समजतं आहे.
ADVERTISEMENT
या घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर आता ते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दुसरीकडे मृतकाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाल प्रशासन या घटनेचे दोषी आहे असा आरोप लावत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे मागणी केली आहे.
कोरोना झाल्याच्या भीतीने वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
हे वाचलं का?
मृताच्या नातेवाईकांचा नेमका आरोप काय?
‘आतापर्यंत त्याची तब्येत चांगली होती त्याला प्लाझ्मा देण्यात आला होता, त्याला रेमडेसिवीर देण्यात आलं होतं. अचानकपणे माझ्या पुतण्याचा आज फोन आला सकाळी साडेआठ वाजता की वडिलांनी रुग्णलयात आत्महत्या केली. त्यानंतर आम्ही सगळे रुग्णालयात आलो. आमचं एवढंच म्हणणं आहे की, व्हेंटिलेटरवर असणारा आमचा पेशंट तिथपर्यंत गेलाच कसा? आयसीयूचा अर्थ काय तर तिथे तुमची विशेष सेवा असते. असं असताना देखील तो पेशंट बेडवरुन दुसरीकडे गेलाच कसा? याला रुग्णालय प्रशासन कारणीभूत आहे, स्टाफ कारणीभूत आहे. त्यांच्यामुळे आमचा पेशंट गेला आहे. त्यांचा स्टाफ जर तिथे असता तर पेशंट तिथवर गेला नसता आणि त्याची आत्महत्या झाली नसती. त्यामुळे या रुग्णालयाच्या प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.’
ADVERTISEMENT
‘जेव्हा त्याचा आम्हाला फोन यायचा तेव्हा तो आम्हाला सांगायचा की, येथील स्टाफ नीट लक्ष देत नाही. लाखो रुपयो घेत असतील आणि तुम्ही रुग्णांकडे नीट लक्ष देत नसतील तर ही चुकीची बाब आहे ना. याचा अर्थ कोरोना रुग्णांकडे दुर्लक्ष करुन फक्त पैसे उकळण्याचं काम सुरु आहे.’ असा गंभीर आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.
ADVERTISEMENT
Lockdown आणि कोरोनाला कंटाळून केशकर्तनालय दुकानदाराची आत्महत्या
रुग्णालय प्रशासनानं काय दिलं स्पष्टीकरण?
‘आमच्याकडे मावळ भागातील एक कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण साधारणपणे १ मेला भरती झाला होता. त्यावेळी त्याला तीव्र लक्षणं दिसून येत होती. त्यामुळे त्याच्यावर आयसीयूमध्ये व्यवस्थित उपचार सुरु होते. पण आज अचानक सकाळी तो रुग्ण अनपेक्षितपणे आयसीयूच्या साइड रुममध्ये गेला आणि त्याने आतून कडी लावून घेतली. यावेळी तेथील स्टाफने तात्काळ त्याच्या मागे जाऊन दार ठोठावलं. पण रुग्णाने आतून काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे स्टाफने तेथील दरवाजा तोडला. दरवाजा उघडताच नेमकी घटना समोर आली. त्यामुळे तात्काळ त्याबाबत पोलिसांना कळविण्यात आलं. पोलिसांनी देखील तात्काळ तपास सुरु केला असून आमच्या बाजूने देखील आम्ही अधिक माहिती घेत आहोत.’ अशी माहिती MIMER कॉलेज आणि रुग्णालयाचे उपप्राचार्य धनाजी जाधव यांनी दिली आहे.
कोरोनामुळे नवऱ्याचा मृत्यू, बातमी समजताच पत्नीची चिमुकल्यासह आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी घटना
दरम्यान, एक दिवसापूर्वी याच MIMER रुग्णालयाने एका मयत रुग्णाच्या उर्वरित बाकी पैशांची भरपाई न केल्यामुळे त्याचा मृतदेह 3 दिवस शवगरात लपवून ठेवले होते. त्यानंतर मृताच्या कुटुंबीयांनी तळेगांव पोलिसात केल्या तक्रारीनंतर पोलिसांनी रुग्णालय प्रशासनाविरूद्ध गुन्हा दाखल केला होता.
हे प्रकरण ताजं असतानाच आता दुसरी मोठी घटना समोर आली आहे. ज्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या इतर रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT