Siddhivinayak: तुपानंतर शिवभोजन.. आदेश बांदेकरांवर निशाणा, MNSचे आरोप
Aadesh Bandekar Siddhivinayak Ganpati: मुंबई: मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Ganpati Mandir) न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी गंभीर असे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर याबाबत त्यांनी सभागृहात सवालही उपस्थित केले होते. ज्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. […]
ADVERTISEMENT
Aadesh Bandekar Siddhivinayak Ganpati: मुंबई: मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Ganpati Mandir) न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी गंभीर असे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर याबाबत त्यांनी सभागृहात सवालही उपस्थित केले होते. ज्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता शिवभोजन थाळीसाठी न्यासाने बेकायदेशीरपणे 5 कोटी रुपये दिल्याच्या आरोपावरुन आदेश बांदेकर आणि मनसे नेते यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांच्यात देखील चांगलीच जुंपली आहे.
ADVERTISEMENT
कोणतीही शाहनिशा न करता आरोप सिद्धिविनायक न्यासावर आरोप करण्यात आले असं म्हणत आदेश बांदेकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. न्यासाच्या अध्यक्षांना असलेल्या राज्यमंत्री पदाच्या राज्यमंत्री दर्जाचा कधीही गैरफायदा घेतला नाही असा दावा बांदेकर यांनी केला आहे.
तसंच बेछूट आरोप करणाऱ्यांवर मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचं बांदेकर यावेळी म्हणाले.
हे वाचलं का?
दरम्यान, याचबाबत मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. गैरकारभाराबाबत सर्व पुरावे दिले असून बांदेकरांनी मानहानीचा दावा जरुर ठोकावा. असं आव्हान किल्लेदार यांनी दिलं आहे.
सिद्धिविनायक: तुपावरुन आदेश बांदेकर रडारवर?, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश
ADVERTISEMENT
शिवभोजन थाळीचा निर्णय झाल्यावर न्यासाने पैसे दिल्याचा दावा बांदेकरांनी केला त्यावरही किल्लेदार यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंच्या गुडबुकमध्ये जाण्यासाठी बांदेकर नियमबाह्य पद्धतीने पाच कोटींचा चेक शिवभोजन थाळीसाठी पाठविल्याचा असा आरोप यशवंत किल्लेदारांनी केला आहे.
पाहा आदेश बांदेकर काय म्हणाले:
‘शासनाच्या विनंतीनुसार पाच कोटींचा जो निधी आहे. जो शासनमान्य जीआर आल्यानंतर आपण शासनाला सुपूर्त केला. ही सुद्धा विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होती. अशावेळेला कोणीही उठतं आणि कोणत्या पद्धतीचे शाहनिशा न करता सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासावर आरोप करतं त्यावेळेला खरंच वेदना होता.’
‘आता सगळ्यात महत्त्वाचं आमच्यावर विधी न्याय विभाग पण आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आमचा ठराव झालेला आहे.’ असं आदेश बांदेकर यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणार आहात? मग ही नियमावली जरुर वाचा
यशवंत किल्लेदारांचं बादेकरांना आव्हान
‘आमच्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत. ते पुरावे मी त्या-त्या वेळी सादर केले आहेत. ते संपूर्ण पुरावे मी न्याय व विधी खात्याकडे पत्रासहीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे दिले आहेत. त्यामुळे ज्या गोष्टीचे पुरावे हातात आहेत त्याच विषयावर आम्ही बोललो आहोत.’
‘माझं त्यांना ओपन चॅलेंज त्यांना आहे की, त्यांनी माझ्यासमोर बसावं आणि त्यांनी माझ्याशी चर्चा करावी. माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत.त्यामुळे मानहानीचा दावा वैगरे अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. काय करायचं ते करु द्या त्यांना.’ असं म्हणत यशवंत किल्लेदार यांनी देखील आदेश बांदेकरांना आव्हान दिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT