माझे सर्व भाऊ माझ्या मैत्रिणींसोबत…; सोनम कपूरचा कॉफी विथ करणमध्ये धक्कादायक खुलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘लेडीज अँड जेंटलमॅन, सोनम इज बॅक’. ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये सोनम कपूरला पाहून तुम्हीही असे म्हणाल. शो स्ट्रीम होण्यापूर्वी, त्याचा धमाकेदार प्रोमो समोर आला आहे. जो सोनमच्या बोल्ड कबुलीजबाबांनी व्हायरल झाला आहे. इतिहास साक्षी आहे जेव्हा जेव्हा सोनम कॉफी विथ करणमध्ये आली तेव्हा तिने लोकांचा जबरदस्त बँड वाजवला आहे. धक्कादायक खुलासे केले आहेत. सोनमने 7 व्या सीझनमध्येही ही परंपरा कायम ठेवली आहे.

ADVERTISEMENT

सोनमने अर्जुनला ट्रोल केले?

प्रोमोमध्ये सोनम कपूर रणबीर कपूरवर निशाणा साधताना दिसत आहे तसेच तिने आपल्या भावांनाही सोडले नाही. सोनम कपूरने चॅट शोमध्ये तिच्या भावांबद्दल खुलासा केल्याने अर्जुन कपूरची बोलती बंद झाली आहे. सोनमने सांगितले की, तिचे सर्व भाऊ तिच्या मैत्रिणींसोबत झोपलेले आहेत. कोणीही वाचलेले नाही. सोनमचे बोलणे ऐकून अर्जुन कपूरला पहिला धक्का बसला, मग त्याने सोनमला प्रश्न केला आणि म्हणाला- तू कशी बहिण आहेस?

भावांबाबतीत हे काय बोलून गेली सोनम कपूर?

करण जोहरच्या प्रश्नावर सोनम म्हणाली – मला याबद्दल चर्चा करायची नाही. माझ्या भावांमध्ये कोणीही राहिलेलं नाही. सोनमचे म्हणणे ऐकून करणने विचारले, कसे भाऊ आहेत तुझे? तेव्हा अर्जुन कपूर म्हणाला- तू कसली बहिण आहेस? तू आपल्या भावांबद्दस असं कसं काय बोलू शकतेस? मला असे वाटते की मला सोनम कपूरकडून ट्रोल करण्यासाठी येथे बोलावण्यात आले आहे. या प्रोमोवर सोनमचा खरा भाऊ हर्षवर्धन कपूरची प्रतिक्रियाही आली आहे. हर्षवर्धनने इंस्टा वर लिहिले – ओह माय गॉड… प्रोमो पाहिल्यानंतर लोक या एपिसोडची स्ट्रीम होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे वाचलं का?

अर्जुन मलायकाबद्दल काय म्हणाला?

सोनम कपूरने करण जोहरच्या शोमध्ये अनेक मसालेदार खुलासे केले आहेत. सोनमने रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाला शिवा नं १ संबोधले आहे. अर्जुनने सांगितले की त्याने फोनमध्ये गर्लफ्रेंड मलायका अरोराचे नाव काय सेव्ह केले आहे. सोनम आणि अर्जुन कपूरचा हा येणारा भाग गुरुवारी प्रसारित केला जाणार आहे, त्यामुळे हा मनोरंजक भाग देखील पाहण्यास सर्वजण उत्सुक आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT