South Korea Halloween stampede : …अन् 151 जणांचे गेले प्राण, हॅलोविन फेस्टिवलमध्ये काय घडलं?
Stampede in Halloween South Korea News : दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हॅलोविन महोत्सवाचा अवघ्या काही वेळात रंगाचा बेरंग झाला. हॅलोविन फेस्टिवलमध्ये प्रचंड गर्दी लोटल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत तब्बल १५१ जणांचा मृत्यू झाला. तर १५० हून अधिक जखमी झालेत. यात तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असल्याचं सांगण्यात आलंय.शनिवारी (२९ ऑक्टोबर) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास […]
ADVERTISEMENT
Stampede in Halloween South Korea News : दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हॅलोविन महोत्सवाचा अवघ्या काही वेळात रंगाचा बेरंग झाला. हॅलोविन फेस्टिवलमध्ये प्रचंड गर्दी लोटल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत तब्बल १५१ जणांचा मृत्यू झाला. तर १५० हून अधिक जखमी झालेत. यात तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असल्याचं सांगण्यात आलंय.शनिवारी (२९ ऑक्टोबर) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
ADVERTISEMENT
तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हॅलोविन फेस्टिवलमध्ये मृत्यूनं तांडव घातलं. हॅलोविन फेस्टिवलमुळे सेऊलमध्ये सर्वत्र उत्साहाचं वातारण होतं. तरुणांसह लोक मोठ्या संख्येनं आले होते. त्याचवेळी ही घटना घडली.
वृत्तसंस्थेनं वृत्तानुसार दक्षिण कोरियात ३ तीन वर्षानंतर हॅलोविन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोना निर्बंधांमुळे हॅलोविन फेस्टिवलच्या आयोजनावर बंदी घालण्यात आलेली होती. हॅलोविन फेस्टिवलमध्ये सहभागी झालेल्या लोकांनी मास्क आणि हॅलोविन वेशभूषा केलेली होती.
हे वाचलं का?
प्रत्यक्षदर्शीच्या माहितीप्रमाणे रात्र झाल्यानंतर गर्दी वाढत गेली. आणि नंतर गर्दी इतकी वाढली की नियंत्रणाबाहेर गेली. लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. त्याचवेळी रात्री १०.२० वाजता ही दुर्घटना घडली.
स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या घटनेत जवळपास ८२ लोक जखमी झाले आहेत. यातल्या १९ लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केलीये. मृत्यू झालेल्यांमध्ये जास्त तरुण आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये १९ लोक परदेशी नागरिक असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
हॅलोविन फेस्टिवलमध्ये नेमकं काय घडलं? (What happened Seoul stampede?)
हॅलोविन फेस्टिवल साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक आले होते. तरुणांचा भरणा जास्त होता. रात्र होत गेल्यानंतर गर्दी वाढत गेली. तुडूंब गर्दी झाली होती. त्याचवेळी गर्दी संकरी गल्लीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. गर्दी वाढली आणि धक्काबुक्की सुरू झाली. त्यानंतर लोक एकमेकांच्या अंगावर पडू लागले. आणि धावपळ उडाली.
ADVERTISEMENT
Absolute scenes of chaos in Itaewon right now as the Halloween night has turned into a major safety hazard with at least several party-goers being carried into ambulances. pic.twitter.com/JqVpbYiFrv
— Hyunsu Yim (@hyunsuinseoul) October 29, 2022
२१ वर्षीय मून जू-यंग या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, इतकी गर्दी झाली होती की, पोलिसांना गर्दीला नियंत्रित करणं अवघड झालं होतं. लोक बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या गल्ल्यातून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी काही लोक संकरी गल्लीकडे जाण्याचा प्रयत्न करू लागले. तिथे जवळपास १० पटीने अधिक गर्दी होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT