लातूर : निलंगा आगारातील एस.टी. कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यातील एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाचा पेच अद्याप सुटलेला नाहीये. राज्यात अनेक एसटी कर्मचारी आत्महत्या करुन आपलं जीवन संपवत आहेत. लातूरच्या निलंगा एसटी आगारातील एका एसटी कर्मचाऱ्याची मृत्यूशी झुंज आज संपली आहे. ३८ वर्षीय शिवदास शिरापुरे यांचं आज रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं आहे.

ADVERTISEMENT

संपाला सुरुवात झाल्यापासून शिवदास सतत नैराश्यात होते. काही दिवसांपूर्वी संपात सहभागी झाले असताना ते जमिनीवर कोसळले. यानंतर झालेल्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतू त्यांची मृत्यूशी झुंज अखेरीस अयशस्वीच ठरली.

कुटुंबातील १० जणांची जबाबदारी असलेल्या घरात शिवदास हे एकटेच कमावते होते. गेल्या काही महिन्यांपासून तुटपुंज्या पगारावर त्यांनी घर चालवलं. संपकाळात सतत सुरु असलेल्या चर्चांमुळे आपलं आणि आपल्या कुटुंबाचं कसं होणार ही चिंता शिवदास यांना असायची.

हे वाचलं का?

मयत शिवकुमार शिरापुरे हे सन २००९ मध्ये सहाय्यक कारागीर बहु व्यवसाय या पदावर पनवेल आगारात नोकरीवर रुजू झाले. ते गेल्या चार वर्षांपूर्वी लातूर जिल्ह्यात बदली होऊन आले होते. ते तीन महिन्यापूर्वीच निलंगा आगारात बदली होऊन आले होते. मयत शिरापुरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. मयतावर शनिवारी दुपारी देवणी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोलापूर : आमच्या पगारात संजय राऊतांनी घर चालवून दाखवावं, संतप्त ST कर्मचाऱ्याचं आव्हान

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT