भाजप-राष्ट्रवादी एकत्र : सुषमा अंधारेंचं एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांना चॅलेंज

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sushma Andhare news : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदेंसह त्यांच्यासोबत बंडखोरी करणाऱ्या 40 आमदारांना डिवचलं आहे. शिंदेंसह बंडखोर आमदार सातत्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपसोबत गेल्याचा दावा करत आहेत. याच मुद्यावरून सुषमा अंधारेंनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

ADVERTISEMENT

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची पुण्यात पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांकडून करण्यात आलेल्या आरोपांबद्दल प्रश्न उपस्थित केले. प्रताप सरनाईक, अर्जून खोतकर यांच्यापासून ते भावना गवळी यांच्यापर्यंत करण्यात आलेल्या आरोप त्यांनी सांगितले. भ्रष्टाचाऱ्याच्या प्रकरणांमुळेच भाजपसोबत गेल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला.

नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप एकत्र, सुषमा अंधारे शिंदेंसह 40 आमदारांना काय म्हणाल्या?

सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “या सगळ्या प्रकरणावरून इतकं लक्षात आलेलं आहे की, त्यांचा आणि हिंदुत्वाचा सुतराम संबंध नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर खेळ करत आम्ही हिंदुत्वासाठी गेलोय असं म्हणणाऱ्या लोकांचं कारण मात्र, वेगळं होतं. हे आता सगळ्या पुराव्यानंतर स्पष्ट होतं”, असं त्या म्हणाल्या.

हे वाचलं का?

Exclusive : नागालँडमध्ये राष्ट्रवादी BJP सोबत; महाराष्ट्रात ‘मविआ’ फुटणार?

“तरीही हिंदुत्वाचा आव आणायचा असेल, तर एकदा लक्षात आणून दिलं पाहिजे की, राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गेली तर हिंदुत्व धोक्यात येतं. असे म्हणणारे आमचे 40 चुकार भाऊ, नागालँडमध्ये आता राष्ट्रवादी भाजपसोबत असणार आहे. अशावेळी तिकडून भाजपला बाहेर पडायला सांगतील का?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी शिंदेंसह 40 आमदारांना केला.

रजनीकांत स्टाईल सगळ्या खुर्च्यांना लाथा मारल्या पाहिजेत -सुषमा अंधारे

सुषमा अंधारे पुढे बोलताना म्हणाल्या, “जर ते बाहेर पडले नाहीत, तर भाजप नकली हिंदुत्ववादी आहे आणि नकली हिंदुत्ववाद्यांसोबत तुम्ही इथे सरकार स्थापन करणार का? मला वाटतं हिंदुत्ववासाठी त्यांनी दणादण रजनीकांत स्टाईल सगळ्या खुर्च्यांना लाथा मारल्या पाहिजेत आणि बाहेर पडले पाहिजे. हिंदुत्वाचा झेंडा घेऊन उभं राहिलं पाहिजे. अन्यथा आम्ही डुप्लिकेट लोक आहोत. आम्हाला हिंदुत्वच काय, आम्हाला मानवता धर्माशीसुद्धा घेणंदेणं नाही, हे त्यांनी एकदा कबूल करावं”, असं चॅलेंज सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांना दिलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT