Terrorists attack : काश्मिरात पुन्हा दोन परप्रांतीयांची हत्या; 2 दिवसांत 3 हल्ले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा नंगानाच सुरूच असून, रविवारी पुन्हा दोन परप्रांतीय कामगारांना लक्ष्य करण्यात आलं. जम्मू काश्मिरातील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी इतर राज्यातून आलेल्या कामगारांची गोळ्या घालून हत्या केली. दोन दिवसांत हा तिसरा हल्ला असून, परप्रांतीय कामगारांना तातडीने जवळच्या लष्करी छावणी वा पोलिसांच्या कॅम्पमध्ये हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ADVERTISEMENT

शनिवारी श्रीनगर आणि कुपवाडात झालेल्या बिहार व उत्तर प्रदेशातील कामगाराच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा परप्रांतीय कामगारांना लक्ष्य केलं. अज्ञात दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मिरातील कुलगाम जिल्ह्यात रविवारी ही घटना घडली आहे.

“भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास ही गोष्ट शोभत नाही”

हे वाचलं का?

कुलगाममधील कामगार राहत असलेल्या लारन गांगीपोरा वानपोह भागात दहशतावादी घुसले. भाड्याने रुम घेऊन राहत असलेल्या परप्रांतीयांवर दहशतवाद्यांनी अंदाधूंद गोळीबार केला. यात कामगार गोळ्या लागून जखमी झाले, तर दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला.

राजा रेशी देव आ जोगींदर रेशी देव अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावं आहेत. दोघंही बिहारमधील असल्याचं प्रशासनातील सूत्रांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

काश्मिरात दहशतवाद्यांचा हैदोस! पाणीपुरीवाल्यासह कारपेंटरची गोळ्या घालून हत्या

ADVERTISEMENT

‘आम्ही आमच्या रुममध्ये बसलेलो होतो. त्यावेळी आमचा एक सहकारी आला आणि त्याने आम्हाला सांगितलं की, आपल्यासोबतच्या तीन सहकाऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. त्यानंतर आम्ही त्या तिघांना घेऊन रुग्णालयात गेलो. तिथे दोघांना मृत्यू घोषित करण्यात आलं’, असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

‘सहा वेळा त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. किती दहशतवादी होते, याबद्दल आम्हाला माहिती नाही. ही घटना घडली त्यावेळी आम्ही रुममध्ये होतो’, असं दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. काश्मिरातील परप्रांतीयांवरील हल्ले वाढले असून, गेल्या 15 दिवसांत 11 नागरिकांच्या हत्या दहशतवाद्यांनी केल्या आहेत

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून परप्रांतीय कामगारांना लक्ष्य बनवलं जात असून, हे हत्यासत्र रोखण्यासाठी काश्मीर पोलिसांनी परप्रांतीय कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आहे. अंदाजा काश्मिरात 50,000 परप्रातीय वास्तव्यास असून, त्यांना पोलीस कॅम्प वा लष्कराच्या छावण्यांमध्ये हलवण्यात यावे, असे आदेश काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी काढले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT