शिंदे आणि ठाकरे गट पुन्हा आमनेसामने! धारावीत सदा सरवणकर आणि शिवसैनिकांची बाचाबाची
प्रभादेवीतल्या हाय व्होल्टेज राजकीय राड्यानंतर आता शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा समोरासमोर आले आहेत. गुरूवारी धारावीत सदा सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली असल्याचं समोर आलं आहे. धारावी शाखेच्या उद्घघाटनच्या वेळी सदा सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये वाद झाला. या वादानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट धारावी पोलीस ठाण्यात गेले होते. यानंतर काही शिवसैनिकांवर गुन्हा दाखल […]
ADVERTISEMENT

प्रभादेवीतल्या हाय व्होल्टेज राजकीय राड्यानंतर आता शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा समोरासमोर आले आहेत. गुरूवारी धारावीत सदा सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली असल्याचं समोर आलं आहे. धारावी शाखेच्या उद्घघाटनच्या वेळी सदा सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये वाद झाला. या वादानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट धारावी पोलीस ठाण्यात गेले होते. यानंतर काही शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकं काय आहे धारावीतल्या वादाचं प्रकरण?
मुंबईतल्या धारावी भागात आमदार सदा सरवणकर तसंच विभाग प्रमुख गिरीश धानोळकर यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे पदाधिकारी निवडण्यासाठीची बैठक ठेवण्यात आली होती. याच दरम्यान ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी येऊन या ठिकाणी गोंधळ घातला असा आरोप केला जातो आहे.
शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या बाचाबाची
यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात बाचाबाची झाली. अखेर शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी धारावी पोलीस ठाण्यात पोहचले. शिंदे गटाच्या तक्रारीनंतर काही शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय आहे. या प्रकरणात पोलीस आता काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिलेल्या माहितीनुसार धारावीत देवीची मिरवणूक होती. त्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. सगळे कार्यकर्ते मिरवणुकीत असताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जातीवाचक शिव्या देण्यास सुरूवात केली. त्यावर जाब विचारला असता बाचाबाची झाली असं ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं म्हणणं आहे.
रिडन फ्रान्सिस फर्नांडो यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजेंद्र सूर्यवंशी, मुथू पठाण आणि चेतन सूर्यवंशी यांच्यावर धारावी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर कलम ५०६, १४३, १४५, ५०४ आणि १३५ अन्वये तक्रार नोंदवण्यात आली आहे.
ठाकरे गटाने काय म्हटलं आहे?
शिंदे गटाची काहीतरी मिटिंग होती असं कळलं होतं. मात्र त्यानंतर ते खाली आले. त्यांनी आम्हाला जातीवरून शिव्या देण्यास सुरूवात केली. आम्ही काय तलवार किंवा चाकू घेऊन रस्त्यात उभे नव्हतो. बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आम्हाला आहे आम्ही जर असं कुणी उगाच करत असेल तर ते कधीही सहन करणार नाही. शिंदे गटाचे लोक या ठिकाणी आले होते. आम्ही त्यांना विरोध दर्शवण्यासाठी शांत पणे उभे होतो. कुणीही त्यांना बोललं नाही मात्र जर आम्हाला जातीवाचक शिव्या दिल्या गेल्या तर आम्ही गप्प का बसायचं? आमच्या तीन लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याबाबत आम्हाला पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात बोलावलं गेलं आहे. आता या प्रकरणी काय करायचं ते ठरवू असंही तिथे उपस्थित असलेल्या एकाने सांगितलं. तसंच या सगळ्यांनी ५० खोके एकदम ओके या घोषणाही दिल्या.