पनामा पेपर लीक प्रकरणी ईडीने ऐश्वर्या रायला विचारले ‘हे’ प्रश्न

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

पनामा पेपर्स लीक ((Panama Papers Leak) प्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला समन्स बजावण्यात आलं. ईडीने हे समन्स बजावल्यानंतर ऐश्वर्या राय दिल्ली येथील ईडी कार्यालयात उपस्थित राहिली आहे. याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चनला ही समन्स बजावण्यात आले होते. ऐश्वर्या रायला या चौकशी दरम्यान काय प्रश्न विचारण्यात आले ते समोर आले आहेत. पनामा पेपर्समधील अॅमिक पार्टनर्स (Amic Partners) ऐश्वर्याला प्रश्न विचारण्यात आले.

ADVERTISEMENT

काय प्रश्न विचारण्यात आले ऐश्वर्याला?

हे वाचलं का?

1) Amic Partners ही 2005 मध्ये ब्रिटीश व्हर्जिन आयलंडमध्ये अंतर्भूत आणि नोंदणीकृत कंपनी होती. तुमचा या कंपनीशी कोणता संबंध होता?

2) तुम्हाला माहिती आहे का लॉ फर्म मॉसॅक फोन्सेकाने कंपनीची नोंदणी केली आहे?

ADVERTISEMENT

3) या कंपनीचे संचालक होते ऐश्वर्या राय, वडील कोटेदिरामण राय कृष्ण राय, आई कविता राय आणि भाऊ आदित्य राय. आपण याबद्दल काय सांगू शकता?

ADVERTISEMENT

4) प्रारंभिक पेड अप कॅपिटल $50,000. च्या प्रत्येक शेअरचे मूल्य $1 होते आणि प्रत्येक संचालकाचे 12,500 शेअर होते.. तुम्ही संचालक पदावरून शेअरहोल्डर का झालात?

5) जून 2005 मध्ये ऐश्वर्या रायचा दर्जा बदलून शेअर होल्डर का करण्यात आला?

6) 2008 मध्ये कंपनी निष्क्रिय का झाली?

7) आर्थिक व्यवहारांसाठी आरबीआयकडून काही परवानगी मागितली होती का?

अभिषेक बच्चनशी लग्न झाल्यानंतर वर्षभरानंतर कंपनी बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली. 2008 मध्ये दुबईस्थित मध्यस्थ बीकेआर अॅडोनिस कन्नन या कंपनीने $1500 मध्ये विकत घेतले आणि 2009 मध्ये (BVI रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडून) बंद केले. लिंक केलेला देश संयुक्त अरब अमिराती आहे असंही समजलं आहे.

ईडीने परकीय चलन व्यवस्थापन कायद्यातंर्गत ऐश्वर्याला समन्स बजावले आहे. हे समन्स गेल्या 9 नोव्हेंबरला बच्चन कुटुंबियांच्या प्रतिक्षा या निवासस्थानी पाठवण्यात आले होते. यावर पुढील 15 दिवसात उत्तर द्यावे, असेही नमूद करण्यात आले होते. ऐश्वर्याने ईडीला ईमेलद्वारे उत्तर दिले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या चौकशी कमिटीमध्ये ईडी, आयकर आणि इतर एजन्सींचा समावेश आहे.

काय आहे पनामा पेपर लीक?

पनामा पेपर्स लीक प्रकरणात एका कंपनीची (Mossack Fonseca) कायदेशीर कागदपत्रे लीक झाली होती. हा डेटा जर्मन वृत्तपत्र Süddeutsche Zeitung (SZ) ने Panama Papers या नावाने 3 एप्रिल 2016 रोजी प्रसिद्ध केला होता. त्यात भारतासह 200 देशांमधील राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटींची नावे होती, ज्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप होता. यामध्ये 1977 ते 2015 अखेरपर्यंतची माहिती देण्यात आली होती. या यादीत तब्बल 300 भारतीयांची नावे होती. ज्यामध्ये ऐश्वर्याशिवाय अमिताभ बच्चन, अजय देवगण यांच्या नावाचाही समावेश होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT