ठाकरे सरकारला अधिवेशन घेण्यात मुळीच स्वारस्य नाही-फडणवीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ठाकरे सरकारला अधिवेशन घेण्यात कोणतंही स्वारस्य नाही असा आरोप आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जनतेच्या प्रश्नात ठाकरे सरकारला काहीही रस नाही. हे सरकार अधिवेशन घ्यायला घाबरतं आहे.

ADVERTISEMENT

राज्यात अनाचार, दुराचार आणि भ्रष्टाचार पसरला आहे. या सरकारमधल्या मंत्र्यांची एक एक प्रकरणं बाहेर येत आहेत. मात्र कुठलीही चौकशी होत नाहीये. कायद्याचं राज्य आहेच कुठे? छोट्या-छोट्या गोष्टींवर बोलणारे महाराष्ट्राचे गृहमंत्री पूजा चव्हाण आणि संजय राठोड प्रकरणी गप्प आहेत.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्समधला आवाज कुणाचा याबद्दल काहीही भाष्य केलेलं नाही. पूजा चव्हाण प्रकरण हे नो वन किल्ड जेसिका या सिनेमासारखं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

अर्थसंकल्पीय अधिवेशन भरवण्यावरून महाविकासआघाडी आणि भाजपमध्ये खडाजंगी होऊन विरोधी पक्षाने या बैठकीतून वॉक आऊट केले आहे. देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना सरकार आपल्याच मंत्र्यांना घाबरत असल्याची टीका केली आहे. संजय राठोडांच्या वेळी सरकारला कोरोना दिसला नाही का असा सवाल बैठकीत विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला.

आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

ADVERTISEMENT

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून आम्ही बाहेर पडलो आहे. सरकारला कोणत्याही चर्चांमध्ये रस नाही. सरकारच्या वतीने पहिल्यांदाच बजेटची प्रक्रियाही पूर्ण करायची नाही असं ठरवण्यात आलं आहे. ही बाब पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पूर्ण अधिवेशन झालं पाहिजे ही आमची मागणी होती. कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज तोडणी सुरू आहे असे अनेक प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी अत्यंत छोटं आणि कायद्यात न बसणारं अधिवेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. बजेटपासून पळ काढणं हे महाराष्ट्राच्या इतिहासात या आधी कधीही झालेलं नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT