…तर अशोक गहलोत यांनाही विरोध! काँग्रेसला फुलटाईम अध्यक्ष हवा, पार्टटाईम नाही; पृथ्वीराज चव्हाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे काँग्रेसचे अध्यक्ष होतील ही बाब जवळपास निश्चित मानली जाते आहे. अशात अशोक गहलोत हे जर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी राहिले आणि अध्यक्ष झाले तर आमचा त्यांना विरोध असेल असं वक्तव्य जी २३ चे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. न्यूज तकला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं आहे.

ADVERTISEMENT

नेमकं काय म्हणाले आहेत पृथ्वीराज चव्हाण?

काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडते आहे ही चांगली गोष्ट आहे. आम्ही या गोष्टीची मागणी केलीच होती. ही मागणी मान्य झाली आहे याचं आम्हाला समाधान आहे. मात्र काँग्रेस पक्षाला पार्ट टाइम नाही तर फुल टाइम अध्यक्ष हवा आहे. नव्या अध्यक्षांनी लोकांची मोकळेपणाने भेट घेतली पाहिजे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे सर्वात आघाडीवर आहेत. मात्र त्यांनी मुख्यमंत्रीपदावर राहून अध्यक्षपद भुषवू नये तसं केल्यास आमचा विरोध असेल असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस हा देशातला सर्वात मोठा लोकशाही मानणारा पक्ष

आमचे दोन उद्देश होते की काँग्रेस हा सर्वात मोठा लोकशाही पक्ष आहे. हा पक्ष मोठा झाला पाहिजे आणि पक्षात लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे. त्यात काँग्रेस पक्ष मजबूत झाला नाही तर मोदींना हरवणं कठीण होईल. आम्ही त्याच अनुषंगाने सोनिया गांधी यांना पत्रही पाठवलं होतं. मात्र त्याचा अर्थ बंड केलं, उठाव केला असा काढला गेला असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

काँग्रेसला फुलटाईम अध्यक्षांची गरज

अशोक गहलोत यांचं नाव सध्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वात पुढे आहे. काँग्रेसला फुलटाईम अध्यक्षांची गरज आहे हे आम्ही आमच्या पत्रात नमूद केलं आहे. आजही जर गहलोत हे मुख्यमंत्रीपद सांभाळून अध्यक्षपद स्वीकारलं तर आम्ही विरोध करू असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

१२ कोटी लोकांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेसला मतदान केलं होतं. हजारो कार्यकर्ते काँग्रेसशी जोडले गेले आहेत. जर असे लोक मिळून एक चांगला अध्यक्ष निवडणार असतील तर त्याच्यावर कुणीही संशय घेण्याची गरज नाही. असं पृथ्वीराज चव्हाण यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी हे काही पक्ष सोडून चाललेले नाहीत. ते आमचे नेते राहणारच आहेत. मात्र जो अध्यक्ष निवडला जाईल तो संघटनात्मक पद्धतीने आणि लोकशाही पद्धतीने निवडला गेला पाहिजे. २४ वर्षांपासून अध्यक्ष निवडला गेला नाही. त्यामुळे पक्ष कमकुवत झाला आहे त्याला बळकटी आणण्यासाठी हे आवश्यक आहे असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT