काँग्रेसवर विसंबून राहण्यात अर्थ नाही, भाजपविरुद्ध पक्षांनी एकत्र येण्याची गरज- ममता बॅनर्जी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेलेल्या घवघवीत यशाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. भाजपच्या यशासोबतच उत्तर प्रदेश, मणिपूर, पंजाब या तीन राज्यांत काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीमुळेही चर्चांना उधाण आलं आहे. अशातच भाजपच्या विरोधक आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणुक निकालांवरुन भाजपवर टीका करत गंभीर आरोप केला आहे.

ADVERTISEMENT

भाजपला मिळालेलं यश हे जनमत नसून मशिनरीच्या माध्यमातून मिळालेलं यश आहे. याचसोबत आता काँग्रेसवर अवलंबून राहण्यात अर्थ नसून ज्यांना भाजपविरुद्ध लढायचं आहे त्यांनी आता एकत्र येणं गरजेचं असल्याचंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

उत्तर प्रदेशात भाजपच्या विजयासाठी ओवैसी आणि मायावतींना पद्मविभूषण, भारतरत्न द्या – संजय राऊत

हे वाचलं का?

केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन आणि हुकुमशाहीच्या जोरावर त्यांनी काही राज्यांमध्ये विजय मिळवला आहे म्हणून सध्या ते आनंदात आहेत. या जोरावर ते २०२४ ची निवडणुक जिंकतील असं त्यांना वाटत आहे, पण हे इतक सोपं नसेल असं ममता बॅनर्जींनी स्पष्ट केलं. दोन वर्षांनी नेमकं काय होईल हे आताच कसं काही सांगता येईल? भाजप बंगालमध्येही खूप दिखावा करतं. त्यांनी यंदा आम्हाला राज्याचा अर्थसंकल्पही मांडू दिला नाही.

इतक्या महागाईनंतरही लोकं भाजप जिंदाबाद म्हणत असतील तर… – हरिश रावतांची हताश प्रतिक्रीया

ADVERTISEMENT

मी आतापर्यंत अशी वागणूक कधीच अनुभवलेली नाही. मी स्वतः रेल्वेमंत्री होते…मी अनेक बजेट मांडली आहेत. सध्या भाजप ज्या पद्धतीने वागत आहे तसं कोणीही वागत नाही. त्यांच्यात जराही दयामाया नाही. जी लोकं स्वतःचा वॉर्ड जिंकू शकत नाहीत ती राज्यात आता फ्लॉप शो करत आहेत अशा शब्दात ममता बॅनर्जींनी विरोधीपक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांच्या आंदोलनावर टीका केली.

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेश निवडणूक : ‘योगीं’बरोबर काँग्रेसनंही घडवला इतिहास; एका निवडणुकीने काय बदललं?

यावेळी बोलत असताना ममता बॅनर्जींनी काँग्रेस पक्षाबद्दल अधिक भाष्य करण्यास नकार दिला. ज्या पक्षांना भाजपविरुद्ध लढायचं आहे त्यांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे, काँग्रेसवर आता अवलंबून राहण्यात अर्थ नाही असंही ममता बॅनर्जींनी स्पष्ट केलं. उत्तर प्रदेशात ईव्हीएम मशिन्सबद्दल अनेक तक्रारी समोर आल्या. वाराणसीच्या अतिरीक्त जिल्हाधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात आलं. अखिलेश यादव यांनी याविषयी आवाज उठवायला हवा. ईव्हीएम मशिन्सची फॉरेन्सिक चाचणी व्हायला हवी. भाजपचा विजय हे जनमत नसून मशिनरीच्या माध्यमातून मिळालेला विजय असल्याचाही आरोप ममता दीदींनी केला.

साहेबांना हे चांगलंच माहित आहे, त्यात फसू नका! भाजप विजयावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रीया

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT