Maratha Reservation: ‘या ठिणगीचा राज्यभर वणवा पसरणार’, भाजप खासदाराचा सरकारला इशारा
विजयकुमार बाबर, सोलापूर ‘मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) राज्य शासनाने केंद्राकडे तात्काळ प्रस्ताव पाठवावा. त्यासाठी राज्यशासनाने उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा एक दिवस वाढवावा पण मराठा आरक्षणाचा प्रश्न निकालात काढावा.’ अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjit Naik Nimbalkar) यांनी केली आहे. सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी केली. यावेळी त्यांनी असंही […]
ADVERTISEMENT

विजयकुमार बाबर, सोलापूर
‘मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) राज्य शासनाने केंद्राकडे तात्काळ प्रस्ताव पाठवावा. त्यासाठी राज्यशासनाने उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा एक दिवस वाढवावा पण मराठा आरक्षणाचा प्रश्न निकालात काढावा.’ अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjit Naik Nimbalkar) यांनी केली आहे. सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी केली.
यावेळी त्यांनी असंही म्हटलं आहे. ‘मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील पहिला मराठा आक्रोश मोर्चाची सुरुवात ही सोलापुरातून होत आहे. या सोलापुरात पडलेल्या ठिणगीचा वणवा राज्यभर पसरेल.’
याबाबत पुढे बोलताना खासदार नाईक- निंबाळकर म्हणाले, ‘राज्य शासनाने मागासवर्गीय आयोगामार्फत तात्काळ सर्वेक्षण पूर्ण करुन त्याचा अहवाल राज्यपालांकडे पाठवावा. तो अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवावा.’