ह्रदयद्रावक! ऊसतोड मजुरांच्या मुलांवर काळाने घातली झडप; कपडे धुवायला गेले, पण परतलेच नाही
ऊसतोडी करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबावर दुःखाचा प्रचंड मोठा आघात झाला. सोलापूर जिल्ह्यातील आष्टी येथे व्यवहारे वस्ती परिसरात ही ह्रदयद्रावक घटना घडली. आईवडील ऊसतोडणीसाठी फडावर गेल्यानंतर कपडे धुण्यासाठी गेलेल्या सख्खे-चुलत भावडं कपडे धुण्यासाठी गेले. ते परत आलेच नाही. कपडे धूत असतानाच तिघांचाही बुडून मृत्यू झाला. मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे ही घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी […]
ADVERTISEMENT
ऊसतोडी करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबावर दुःखाचा प्रचंड मोठा आघात झाला. सोलापूर जिल्ह्यातील आष्टी येथे व्यवहारे वस्ती परिसरात ही ह्रदयद्रावक घटना घडली. आईवडील ऊसतोडणीसाठी फडावर गेल्यानंतर कपडे धुण्यासाठी गेलेल्या सख्खे-चुलत भावडं कपडे धुण्यासाठी गेले. ते परत आलेच नाही. कपडे धूत असतानाच तिघांचाही बुडून मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे ही घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी घडलेली घटना रात्री आठ वाजता आई-वडील फडातून पालावर आल्यावर उघडकीस आली.
हे वाचलं का?
आष्टी येथील व्यवहारे वस्तीवर लोकनेते साखर कारखान्यांच्या ऊस तोडणी मजुरांची पालं पडली आहेत. त्यात परभणी जिल्ह्यातील बोरवंड येथील गायकवाड आणि जाधव परिवारातील सदस्य ऊस तोडणी कामगार म्हणून कामाला आले आहेत.
शुक्रवारी सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे ऊस तोडणी मजूर मुलांना कोप्यांवर ठेवून फडावर गेले. त्यानंतर पालावरील रेणुका अंकुश जाधव (वय १७), चुलत भाऊ अजय बाळू जाधव (वय ५) आणि सुरेखा हिरामत गायकवाड असे तिघे ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेले अन ओढ्याच्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
ही दुर्दैवी घटना दुपारी झाली. मात्र रात्रीपर्यंत याची कुणालाच माहिती नव्हती. रात्री आठ वाजता त्यांचे आई-वडील पालावर आल्यावर त्यांनी मुलांची शोधा शोध सुरु केली.
ADVERTISEMENT
शोध घेत असताना ओढ्यावर त्यांच्या चपला आणि धुण्याची बादली पाहुन अंदाज आला. मग पाण्यात शोधले असता रात्री दोन्ही मुलींचे मृतदेह मिळाले, तर मुलाचा मृतदेह शनिवारी सकाळी १० वाजता सापडला. या प्रकरणी मोहोळ पोलिसांत अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT