प्रजासत्ताक दिनी ‘या’ 3 गोष्टी घडल्या पहिल्यांदा

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बांगलादेशच्या लष्कराचे १२२ सैनिकांनी पहिल्यांदाच दिल्लीतील राजपथावर संचलन केलं. यंदा बांगलादेश मुक्तिसंग्रामाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे स्वतंत्र बांगलादेशच्या लढाईत भारतीय लष्कराच्या जवानांनी दिलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञताही म्हणून ते दिल्लीतील संचलनात सहभागी झाले. बांगलादेशच्या लष्कराचे कर्नल मोहताशिम हैदर चौधरी यांनी या पथकाचं नेतृत्व केलं.

याबद्दल बोलताना कर्नल म्हणाले की, राजपथाच्या संचलनात यंदा दोन पथके सहभागी होणार असून, त्यातील एक संचलन करणारे, तर एक बँड पथक आहे. लष्करी संचलन पथकामध्ये तिन्ही दलाचे सैनिक सहभागी होणार असून, त्यात हवाई लेफ्टनंट, नौदल लेफ्टनंट, मेजर आणि तीन लेफ्टनंट कर्नल यांचा समावेश आहे. यापूर्वी २०१६च्या संचलनामध्ये फ्रान्स, तर २०१७च्या संचलनात ‘यूएई’चे पथक अशाप्रकारेच सहभागी झाले होते.

त्याशिवाय भारताचे अत्याधुनिक लढाऊ विमान रफालनेही प्रथमच राजपथवरून उड्डाण केलं. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रथमच भारतीय हवाई दलातील फ्लाइट लेफ्टनंट भावना कांत यांनी सहभाग घेतला. भावना कांत या मुळच्या बिहारच्या आहेत आणि परेडमध्ये सहभागी होणा-या त्या पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याबरोबरच कुठल्याही परदेशी राष्ट्राचा प्रमुख राजपथावरील परेडमध्ये सहभागी झाला नाही ही घटनाही तब्बल ५५ वर्षांनी घडली. खरंतर आजच्या प्रजासत्ताक दिनाला ब्रिटनच्या पंतप्रधानांना आमंत्रण होतं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला दौरा रद्द केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT