H3N2 Virus: एन3एन2 पासून होईल बचाव, फक्त जेवणात या चार गोष्टींचा करा समावेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

H3N2 Virus superfoods
H3N2 Virus superfoods
social share
google news

H3N2 Virus superfoods : भारतात एच3एन2 (H3N2) हा नवा जीवघेणा संसर्ग सातत्याने वाढत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत या विषाणूचा संसर्ग झालेले रूग्ण आढळत आहेत. गेल्या तीन वर्षात कोरोनामुळे संपूर्ण जगाला मोठा फटका बसला. कोरोनातून परिस्थिती सावरलेली असतानाच आता या नव्या संसर्गाने डोके वर काढले आहे. यामध्ये श्वसनाच्या समस्या होत आहेत. जिथे लोकांमध्ये सर्दी-खोकला यांसारखी लक्षणे दिसत आहेत, तिथे H3N2 संसर्गाची प्रकरणंही वेगाने वाढत आहेत.

H3N2, H1N1 अन् कोरोना: एकाचवेळी 3 रोगांचा धोका… जाणून घ्या फरक, लक्षणं, उपचार

एच3एन2 प्रकरणांमध्ये वाढ होण्यास हवामानातील बदल देखील जबाबदार ठरत आहेत. भारतातील अनेकांना गेल्या काही महिन्यांपासून सतत सर्दी-खोकला आणि तापाचा त्रास होत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये लहान मुले आणि वृद्धांना विशेष काळजी आणि पोषक आहार घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

या संसर्गापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी चांगली प्रतिकारशक्ती असणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी असे काही घरगुती रामबाण उपाय जाणून घेऊयात ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत मिळेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

h3n2 Maharashtra: महाराष्ट्रात पहिला बळी, नागपूरमध्येही संशयिताचा मृत्यू

एच3एन2 ची लक्षणे कोणती?

एच3एन2 रुग्णांना ताप, खोकला, श्वसनाचा त्रास, घसा दुखणे, न्यूमोनिया होणे या प्रकारची लक्षणं आढळतात. या संसर्गामुळे रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते.

H3N2 Virus : भारतात H3N2 विषाणूचे 2 बळी, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

एच3एन2 पासून दूर ठेवतील या गोष्टी

  • दालचिनीमध्ये अनेक औषधी गुण आढळतात. ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. याशिवाय, यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने शरीराला हानिकारक विषाणूंपासून वाचवते.
  • जेव्हा सर्दी-खोकला होतो तेव्हा आल्याचं सेवन केलं जातं. यामुळे घशातील खवखव दूर होते. यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात आणि ते रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्याचे काम करतात.
  • मसाल्यांमध्ये हळदीला प्रभावी मसाला मानलं जातं. यामध्ये करव्यूमिन नावाचा एक कंपाऊंड आहे, ज्यामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत आणि रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी कार्य करते.
  • लवंगमध्ये अशी अनेक गुणधर्म आढळतात जी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात, जसे की युजेनॉल यात संसर्गविरोधी अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT