एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यात उद्धव ठाकरेंनी टाकला ‘डाव’! भाजप आमदाराच्या भावावर सोपवली मोठी जबाबदारी
–इम्तियाज मुजावर, सातारा शिंदेंच्या बंडामुळे सरकार गेलं. पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाणही गोठवला गेला. त्यामुळे शिंदेंसह 40 बंडखोर आमदारांना आस्मान दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे जोराने तयारीला लागल्याचं दिसतं आहे. बंडखोरी केलेल्या आमदार-खासदारांच्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात ठाकरेंनी काम सुरू केल्याचं दिसत आहे. एकनाथ शिंदेंचा जिल्हा असलेल्या साताऱ्यात उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी केलीये. शिंदे गटाला फाईट देण्यासाठी […]
ADVERTISEMENT

–इम्तियाज मुजावर, सातारा
शिंदेंच्या बंडामुळे सरकार गेलं. पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाणही गोठवला गेला. त्यामुळे शिंदेंसह 40 बंडखोर आमदारांना आस्मान दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे जोराने तयारीला लागल्याचं दिसतं आहे. बंडखोरी केलेल्या आमदार-खासदारांच्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात ठाकरेंनी काम सुरू केल्याचं दिसत आहे. एकनाथ शिंदेंचा जिल्हा असलेल्या साताऱ्यात उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी केलीये. शिंदे गटाला फाईट देण्यासाठी ठाकरेंनी भाजप आमदाराच्या सख्ख्या भावालाच मैदानात उतरवलंय.
सातारा जिल्ह्यात एकीकडे शिंदे गटात धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरेंनी भाजप आमदाराच्या भावाला पक्षात घेत नवा डाव टाकलाय. माण तालुक्याचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचे लहान बंधू शेखर गोरे यांना शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महत्त्वाचं काम देण्यात आलंय. जयकुमार गोरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात.
नितीन बानगुडे यांच्याकडून जबाबदारी काढून घेऊन शेखर गोरे यांच्याकडे देण्याची मागणी सातारा जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून सुरू होती. शेखर गोरे यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिल्यास पक्ष मजबूत होईल, असं पक्षाच्या नेत्यांना सांगितलं जात होतं. त्यानंतर आता शेखर गोरे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी सातारा जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवलीये. शेखर गोरे ठाकरेंच्या गटात गेल्यानं सत्ताधारी भाजप-शिंदे गट विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात चांगली लढत बघायला मिळू शकते, असं बोललं जातंय.