उद्धव ठाकरे : ‘देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भाजप असं का वागलं, हे मलाही समजलं नाही’
उद्धव ठाकरे पायउतार झाल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसतील, असाच सूर होता. मात्र, शपथविधीला काही मिनिटांचा वेळ असतानाच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील अशी घोषणा करण्यात आली. यामुळे राजकीय वर्तुळासह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेवर उद्धव ठाकरेंनी आता भाष्य केलंय. शरद पवारांबाबतही त्यांनी भाष्य केलं. उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध […]
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे पायउतार झाल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसतील, असाच सूर होता. मात्र, शपथविधीला काही मिनिटांचा वेळ असतानाच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील अशी घोषणा करण्यात आली. यामुळे राजकीय वर्तुळासह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेवर उद्धव ठाकरेंनी आता भाष्य केलंय. शरद पवारांबाबतही त्यांनी भाष्य केलं.
उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आज प्रसिद्ध झाला. कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. शरद पवार दगा देतील असं सांगितलं जात होतं मात्र मला माझ्याच लोकांनी दगा दिला असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
संजय राऊतांनी शिंदे सरकारबद्दल उद्धव ठाकरेंना काय केला सवाल?
संजय राऊत – तुम्ही अडीच वर्षे राज्याचा कारभार केलात. सरकार चालवलंय. आजच्या नवीन सरकारकडे तुम्ही कसे पाहता?
उद्धव ठाकरे – सरकार स्थापन झाल्यावर याच्यावरती ‘बोलण्यात’ अर्थ आहे.