“मोदी आणि त्यांच्या बगलबच्च्यांना देश…”, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
Shiv Sena UBT Attacks On Narendr Modi And BJP : राहुल गांधींनी लंडनमध्ये केलेल्या विधानावरून भाजपने थेट त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली. भाजपने केलेल्या मागणीवर शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपलाच खडेबोल सुनावले आहेत. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानांवर बोट ठेवत ठाकरेंच्या शिवसेनेनं काही सवाल मोदी आणि भाजपला सामना अग्रलेखातून केले […]
ADVERTISEMENT

Shiv Sena UBT Attacks On Narendr Modi And BJP : राहुल गांधींनी लंडनमध्ये केलेल्या विधानावरून भाजपने थेट त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली. भाजपने केलेल्या मागणीवर शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपलाच खडेबोल सुनावले आहेत. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानांवर बोट ठेवत ठाकरेंच्या शिवसेनेनं काही सवाल मोदी आणि भाजपला सामना अग्रलेखातून केले आहेत.
शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखात म्हटलं आहे…
“राहुल गांधी लंडन येथे गेले व हिंदुस्थानी लोकशाहीवर त्यांनी शंका उपस्थित केल्या. ‘हिंदुस्थानातील लोकशाही धोक्यात आहे. विरोधी पक्षनेते बोलत असताना संसदेतील माईक बंद केले जातात,’ अशी टीका गांधी यांनी केली. त्यामुळे भाजप नेत्यांचे लोकशाहीवरील पुतनामावशीचे प्रेम उतूमातू जाताना दिसत आहे. संसदेच्या पहिल्याच दिवशी भाजप खासदारांनी गदारोळ केला व कामकाज बंद पाडले. पंतप्रधान मोदींना तर लोकशाहीच्या नावाने जणू हुंदकेच फुटत आहेत.”
मोदी पक्षाने आत्मचिंतन करायला हवं, ठाकरेंचा टोला
“मोदी यांचे कर्नाटकात त्यामुळे जाणे-येणे वाढले आहे व कर्नाटकातील प्रत्येक सभेत ते गांधी यांनी लोकशाहीचा अपमान केल्याचा आक्रोश करीत आहेत. जगातील कोणतीही शक्ती हिंदुस्थानच्या लोकशाही परंपरेचे नुकसान करू शकत नाही हे मोदी यांचे म्हणणे खरे आहे, पण हिंदुस्थानातील लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम प्रत्यक्ष सत्ताधारी भाजप करीत आहे व त्याच भाजपचे नेतृत्व मोदी करीत आहेत. मुळात राहुल गांधी यांनी लोकशाहीबाबत लंडन येथे केलेली विधाने चूक आहेत काय याचे आत्मचिंतन मोदी पक्षाने करायला हवे”
CM शिंदेंकडून ठाकरेंना आणखी एक धक्का, मोठा नेता लागला गळाला!