IPL 2021 च्या सामन्यावर बेटींग करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक
आयपीएलच्या सामन्यावर बेटींग करणाऱ्या दोघांना उल्हासनगर क्राईम ब्रँचने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये एक आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचा मुलगा आहे. नगरसेवक सतरामदास जेसवानी यांचा मुलगा गिरीश हा चेन्नई विरुद्ध दिल्ली या सामन्यावर बेटींग लावत होता. उल्हासनगर क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना याविषयी माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी बुकी विशाल सावलानी याच्या ओटी सेक्शन परिसरातील घरी […]
ADVERTISEMENT

आयपीएलच्या सामन्यावर बेटींग करणाऱ्या दोघांना उल्हासनगर क्राईम ब्रँचने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये एक आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचा मुलगा आहे. नगरसेवक सतरामदास जेसवानी यांचा मुलगा गिरीश हा चेन्नई विरुद्ध दिल्ली या सामन्यावर बेटींग लावत होता.
उल्हासनगर क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना याविषयी माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी बुकी विशाल सावलानी याच्या ओटी सेक्शन परिसरातील घरी धाड टाकून क्रिकेट माझा या मोबाईल App च्या सहाय्याने सुरु असलेल्या बेटींगचा पर्दाफाश केला.
बेटींगसाठी लागणारे मोबाईल व इतर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्यांवर उल्हासनगरमधली ही दुसरी मोठी कारवाई मानली जात आहे.