UP election : गोव्यानंतर आदित्य ठाकरेंची उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारात उडी
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर शिवसेनेनं आता उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रीत केलं आहे. शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. शिवसेनेनं ३७ उमेदवारांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत असून, गोवा, पंजाब, उत्तराखंडमध्ये मतदान पार पडलं असून, आता उत्तर प्रदेश आणि मणिपूर […]
ADVERTISEMENT

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर शिवसेनेनं आता उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रीत केलं आहे. शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. शिवसेनेनं ३७ उमेदवारांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे.
देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत असून, गोवा, पंजाब, उत्तराखंडमध्ये मतदान पार पडलं असून, आता उत्तर प्रदेश आणि मणिपूर विधानसभेसाठी मतदान व्हायचं बाकी आहे. उत्तर प्रदेशात सात टप्प्यात मतदान होत असून, तीन टप्प्यात मतदान झालं आहे. तर उर्वरित टप्प्याचं मतदान शिल्लक आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हातात दोन घड्याळं का घालतात माहित आहे का?
दरम्यान, शिवसेनेनं आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीकडे लक्ष वळवलं आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरलेले पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आता उत्तर प्रदेशातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.










