चितेवरच हलू लागले आजोबांचा हात-पाय, नंतर सुरु झाली नातेवाईकांची पळापळ…

मुंबई तक

ADVERTISEMENT

uttar pradesh viral story banda people surprised to see action in dead body on funeral
uttar pradesh viral story banda people surprised to see action in dead body on funeral
social share
google news

Viral Story: उत्तर प्रदेशातील बांदामध्ये (Banda Uttar pradesh) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर (death) कुटुंबीयांनी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशानभूमीत घेऊन गेले. मात्र अंत्यसंस्कार करताना मात्र जे काही घडले ते बघून अनेकांना धक्का बसला आहे. स्मशानभूमीत मृतदेहाची हालचाल दिसू लागताच कुटुंबीयानीही पळापळ करुन पुन्हा तो मृतदेह रुग्णालयात घेऊन गेले. कुटुंबीयांची पळापळ आणि धावपळ बघून नंतर डॉक्टरही चक्रावले आणि त्यांनी मृतदेहाची तपासणी करायला चालू केली. (uttar pradesh viral story banda people surprised to see action in dead body on funeral)

तयारी अंत्यसंस्काराची अन्..

बांदामधील कोतवाली परिसरातील शंभूनगर मोहल्ला येथील वृंदावन (वय 76 ) यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह घेऊन स्मशानभूमीत गेले होते. त्यानंतर मृतदेहावच्या अंत्यसंस्काराचीही तयारी सुरू झाली. अंत्यसंस्करासाठी मृतदेह चितेवरही ठेवण्यात आला होता. सारे कुटुंबीय दुःख सागरात असतानाच एक घटना घडली आणि सारेच गोंधळून गेले.

मृतदेहच हलू लागला

अंत्यसंस्कारासाठी चितेवर ठेवण्यात आलेल्या वृद्धाचे ओठ आणि गाल हलताना दिसून आले. त्यामुळे मृतदेहामध्ये जीव असल्याचा संशय कुटुंबीयांना आला. त्यानंतर कुटुंबीयांनीही त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Maratha Reservation : शिंदे सरकारला ज्याची भीती, मनोज जरांगेनी उपसले ‘तेच’ शस्त्र! सांगितली पुढची स्ट्रॅटजी

डॉक्टरांनी शास्त्र सांगितले

या घटनेविषयी वृंदावन यांच्या मोठ्या मुलाने सांगितले की, त्याच्या वडिलांना 3 दिवसांपासून ताप होता. त्यावर उपचारही सुरु होते. मात्र, शुक्रवारी रात्री वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मुक्तिधाम स्मशानभूमीत घेऊन गेले. त्यानंतर त्यांच्या शरीराची हालचाल दिसू लागली. त्याचमुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शरीराचे तापमानात बदल

त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले की, कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर शरीराचे तापमान हळूहळू कमी होत असते. त्यामुळे स्नायू सतत हलत असतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी जिवंत असल्याचे वाटल्याने त्यांनी रुग्णालयात आणले होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> डेटिंग अ‍ॅपवर भेट, 3 दिवस कारमध्ये ठेवला मृतदेह; ‘त्या’ हत्येची Inside Story

    follow whatsapp

    ADVERTISEMENT