ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंची प्रकृती चिंताजनक, दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे डॉक्टर काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली आहे. गेल्या चोवीस तासात ते उपचारांना प्रतिसाद देत नाहीत. त्यांच्या वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत अशी महत्त्वाची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे डॉक्टर शिरीष याडगिकर यांनी दिली आहे. काही वेळापूर्वीच मेडिकल बुलेटीन जारी करण्यात आलं त्यात डॉ. याडगिकर यांनी ही माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाकडून काय माहिती दिली गेली?

राजेश याडगिकर हे दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम गोखले यांची प्रकृती गेल्या २४ तासात जास्त खालावली आहे. त्यांना वाचवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. कुठल्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. कुणीही अफवा पसरवत असेल तर त्यांना थांबवा असं आवाहनही डॉक्टरांनी केलं आहे. गोखले कुटुंब आणि दीनानाथ मंगेशर रूग्णालयातले डॉक्टर यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर आम्ही ही माहिती देत आहोत. विक्रम गोखले हे व्हेटिंलेटवर आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता पुढचं बुलेटीन होईल असंही डॉक्टर याडगिकर यांनी सांगितलं आहे.

विक्रम गोखलेंचे फॅमिली फ्रेंड राजेश दामलेंनी काय म्हटलंय?

विक्रम गोखलेंची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. त्यांच्याबाबतच्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं मी त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सांगायला आलो आहे. विक्रम गोखलेंचे फॅमिली फ्रेंड राजेश दामले यांनी ही माहिती दिली आहे. मेडिकल बुलेटीन आवश्यक वाटलं तर घेण्यात येईल किंवा जी पुढची माहिती असेल ती वेळोवेळी देऊ मात्र कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT