विधान परिषद निवडणूक : पंकजा मुंडेंनीच मला तिकीट द्यायला सांगितलं असेल -उमा खापरे
भाजपने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. यात एक नाव आहे उमा खापरे यांचं. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा असलेल्या उमा खापरेंना अचानक संधी मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. कारण पंकजा मुंडे, चित्रा वाघ या महिला नेत्यांना बाजूला ठेवत भाजपने खापरे यांना उमेदवारी दिलीये. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमा खापरेंनी ‘मुंबई तक’ला मुलाखत दिली. प्रश्न – भाजपकडून मिळलेली […]
ADVERTISEMENT

भाजपने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. यात एक नाव आहे उमा खापरे यांचं. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा असलेल्या उमा खापरेंना अचानक संधी मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. कारण पंकजा मुंडे, चित्रा वाघ या महिला नेत्यांना बाजूला ठेवत भाजपने खापरे यांना उमेदवारी दिलीये. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमा खापरेंनी ‘मुंबई तक’ला मुलाखत दिली.
प्रश्न – भाजपकडून मिळलेली उमेदवारी अपेक्षित होती की, अनपेक्षित?
उमा खापरे – माझ्यासाठी अनपेक्षित होतं. मला काहीही कल्पना नव्हती. मी कुठे उमेदवारी मागायलाही गेले नव्हते. मला सकाळी नाव चर्चेत असल्याचा फोन आला आणि त्यानंतर ८ वाजता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फोन करून माझं अभिनंदन केलं. माझ्यासाठी हा धक्काच होता. मी भाजपची कार्यकर्ता आहे. १९९७ पासून काम करतेय. महिला मोर्चाची अध्यक्षा म्हणून मी कामात गुंतवून घेतलंय. त्यामुळे हे माझ्यासाठी आश्चर्याचा धक्काच आहे. हे फक्त भाजपमध्येच होऊ शकतं, हे पु्न्हा सिद्ध झालं.
Vidhan Parishad Election: दिग्गजांचा पत्ता कट, कोण आहेत उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय?