पक्षाचा आदेश पाळायचा हे आमच्या रक्तात भिनलेलं -आमदार मुक्ता टिळक

मुंबई तक

महाराष्ट्र विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्यसभेप्रमाणेच भाजपच्या आमदार मुक्ता टिळक या मतदानासाठी रवाना झाल्या आहेत. मतदानाला रवाना होण्यापूर्वी मुक्ता टिळक यांनी पुण्यात माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी आजारी असूनही मतदानाला जाण्यामागची भूमिका स्पष्ट केली. विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज निवडणूक होत आहे. ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्र विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्यसभेप्रमाणेच भाजपच्या आमदार मुक्ता टिळक या मतदानासाठी रवाना झाल्या आहेत. मतदानाला रवाना होण्यापूर्वी मुक्ता टिळक यांनी पुण्यात माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी आजारी असूनही मतदानाला जाण्यामागची भूमिका स्पष्ट केली.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज निवडणूक होत आहे. ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे एका एका मतासाठी राजकीय पक्षांकडून धावपळ केली जात असल्याचं दिसत आहे.

Vidhan Parishad Election Live Update : दहाव्या जागेवर कोण मारणार बाजी?

राज्यसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक हे दोन्ही आमदार आजारी असूनही रुग्णवाहिकेतून मुंबईत मतदानासाठी दाखल झाले होते. भाजपच्या विजयात दोन्ही आमदारांची मतं महत्त्वाची ठरली होती.

आता पुन्हा आज होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आज सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक यांच्या सोबत मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्या.

“विधान परिषद निवडणुकीसाठी मी…” उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य चर्चेत

विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यापूर्वी मुक्ता टिळक काय म्हणाल्या?

रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना मुक्ता टिळक म्हणाल्या, “आज विधान परिषदेची निवडणूक होत असून, सर्वच पक्षांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे. तर या निवडणुकीत भाजप तर कसे मागे राहिल. पक्षाने दिलेला आदेश पाळायचा, हे आमच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे. त्यामुळे मी आज मतदानाला जात आहे.”

“राज्यसभा निवडणुकीत आमचे उमेदवार विजयी झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणं झालं.त्यावेळी त्यांनी माझे आभार मानले. पक्षातील सर्वजण काळजी घेतात. त्यामुळे विशेष ममत्व वाटत असल्याची भावना आहे,” असं आमदार मुक्ता टिळक म्हणाल्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp