गुजरात : मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं नाव चर्चेत
गुजरात विधानसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपलेली असतानाच मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षामध्ये काळानुसार जबाबदाऱ्या बदलत जातात. भाजपतील ही नियमित प्रक्रिया आहे, असं त्यांनी राजीनाम्यानंतर सांगितलं. कर्नाटकात मुख्यमत्री बदलाच्या निर्णयानंतर भाजपनं गुजरातमध्येही नेतृत्वात बदल केला आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा सादर केला. […]
ADVERTISEMENT

गुजरात विधानसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपलेली असतानाच मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षामध्ये काळानुसार जबाबदाऱ्या बदलत जातात. भाजपतील ही नियमित प्रक्रिया आहे, असं त्यांनी राजीनाम्यानंतर सांगितलं.
कर्नाटकात मुख्यमत्री बदलाच्या निर्णयानंतर भाजपनं गुजरातमध्येही नेतृत्वात बदल केला आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा सादर केला.
राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना रुपाणी म्हणाले, ‘जे.पी. नड्डा यांचं मार्गदर्शन माझ्यासाठी महत्त्वपूर्ण राहिलं. आता मला जी जबाबदारी दिली जाईल, ती पार पाडण्याचं काम करेन’, असं रुपाणी यांनी सांगितलं.
‘मी पद नाही, तर जबाबदारी म्हणतोय. मला जी जबाबदारी देण्यात आली होती. ती मी पार पाडली आहे. आम्ही गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढलो. २०२२ मधील विधानसभा निवडणुकही मोदींच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल’, रुपाणी माध्यमांशी बोलताना म्हणाले.










