मोठी बातमी : विनायक मेटे अपघात प्रकरणात कार चालक एकनाथ कदमला अटक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी गाडीचा चालक एकनाथ कदम याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (CID) मार्फत करण्यात आलेल्या तीन महिन्यांच्या चौकशीनंतर रसायनी पोलीस स्टेशनमध्ये नुकताच त्याच्याविरोधात  कलम 304 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज त्याला अटक करुन खालापूर दिवाणी न्यायालात हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

मराठा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे पाच वाजता मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाला होता. यात विनायक मेटे यांचं निधन झालं होतं. यानंतर त्यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिले होते.

प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सीआयडीच्या चौकशीमध्ये विनायक मेटे यांच्या गाडीचा चालक 130-140 ताशी किलोमीटर वेगाने गाडी चालवलत असल्याचे समोर आले होते. गाडीचा अपघात होण्याआधी चालकाने दुसरी गाडी ओव्हरटेक करत असतानाही आपली गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातच हा अपघात झाला, असेही सीआडीच्या तपासात समोर आलं. यानंतर चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ज्योती मेटे यांनी व्यक्त केली होती शंका

अपघातानंतर बोलताना विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शंका व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या होत्या, विनायक मेटेंचा मृतदेहं सांगत होता की त्यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात आणलं गेलं नाही. मी डॉक्टर असल्यानं माझ्या ते लक्षात आलं. अपघात झाल्यानंतर दीड ते दोन तासांनी त्यांना रुग्णालयात आणलं गेल्याचा गंभीर आरोप ज्योती मेटे यांनी केला होता.

अपघात नेमका कसा घडला आणि आम्हाला किती वेळानंतर माहिती देण्यात आली या गोष्टींची आम्हाला माहिती मिळाली पाहिजे.” रुग्णवाहिकेचा नंबर संगळ्यांकडे असतो, ड्रायव्हर फोन करु शकला असता, तो आम्हाला अपघाताचं नेमकं लोकेशन देत नव्हता असा धक्कादायक आरोप ज्योती मेटे यांनी केला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT