Washim: तपासादरम्यान पोलिसांचा कुत्रा भुंकला आणि बिंग फुटलं, वडिलांची हत्या करणारा मुलगा अटकेत
वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका देवळाच्या पुजाऱ्याच्या हत्येचं गुढ उकलण्यात 24 तासांत पोलिसांना यश आलं आहे. पोटच्या मुलानेच पुजाऱ्याची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. आपल्या मुलाला वारंवार घालुन-पाडून बोलत असल्याचा राग मनात ठेवत आरोपीने हे कृत्य केल्याचं कळतंय. केकतउमरा शिवारातील दुर्गामाता मंदिराचे पुजारी मारोती लक्ष्मण पुंड यांची धारदार शस्त्राने पाठीमागून डोक्यात […]
ADVERTISEMENT
वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका देवळाच्या पुजाऱ्याच्या हत्येचं गुढ उकलण्यात 24 तासांत पोलिसांना यश आलं आहे. पोटच्या मुलानेच पुजाऱ्याची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. आपल्या मुलाला वारंवार घालुन-पाडून बोलत असल्याचा राग मनात ठेवत आरोपीने हे कृत्य केल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
केकतउमरा शिवारातील दुर्गामाता मंदिराचे पुजारी मारोती लक्ष्मण पुंड यांची धारदार शस्त्राने पाठीमागून डोक्यात वार करत हत्या करण्यात आली होती. मंदिरात हत्या झाल्यामुळे पोलिसांना सुरुवातीला चोरीचा संशय आला होता. परंतू मंदिरातील सर्व गोष्टी जागच्या जागी असल्यामुळे पोलिसांना तपासाची दिशा बदलावी लागली.
यावेळी पोलीस तपासादरम्यान श्वानपथकातला एक कुत्रा मयत पुजारी मारोती पुंड यांचा मुलगा गणेश याच्याकडे पाहून वारंवार भुंकत होता. हे पाहून पोलिसांना संशय बळावला आणि त्यांनी गणेशला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यावेळी सुरुवातीला गणेशने सकाळी वडीलांना उठवण्यासाठी गेलो असता त्यांचा मृतदेह सापडल्याचं गणेशने सांगितलं.
हे वाचलं का?
परंतू पोलीसी खाक्यासमोर अखेरीस गणेशने आपला गुन्हा मान्य केला. वडील वारंवार आपल्या मुलाला घालुन-पाडून बोलायचे, त्याचा तिरस्कार करायचे याचा राग मनात होता. म्हणूनच आपण हत्या केल्याचं गणेशने मान्य केलं. ज्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT