Kangana Ranaut: ‘1947 साली स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळालं’, कंगनाचं वादग्रस्त विधान
नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अनेकदा काही वक्तव्यं करुन कंगनाने वाद ओढावून घेतल्याचं आतापर्यंत आपण पाहिलं आहे. आता देखील कंगनाने एक अशाच पद्धतीचं अत्यंत वादग्रस्त विधान केलं आहे. ज्यावरुन सोशल मीडियावर तिच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. कंगनाने एका कार्यक्रमात असं वक्तव्य केलं आहे की, ‘1947 साली […]
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अनेकदा काही वक्तव्यं करुन कंगनाने वाद ओढावून घेतल्याचं आतापर्यंत आपण पाहिलं आहे. आता देखील कंगनाने एक अशाच पद्धतीचं अत्यंत वादग्रस्त विधान केलं आहे. ज्यावरुन सोशल मीडियावर तिच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. कंगनाने एका कार्यक्रमात असं वक्तव्य केलं आहे की, ‘1947 साली जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे.’
ADVERTISEMENT
अभिनेत्री कंगना राणौत हिने सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर ज्या पद्धतीने भूमिका घेतली होती. तेव्हापासून ती प्रचंड चर्चेत आहे. त्याचवेळी तिने काही वादग्रस्त वक्तव्य देखील केली होती. आता देखील कंगनाने अतिशय बेजबाबदारपणे एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलताना कंगना राणावत म्हणाली की, ‘1947 साली जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे.’
हे वाचलं का?
पाहा कंगनाचं नेमकं विधान काय
‘सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेते सुभाषचंद्र बोस या लोकांबद्दल बोललो तर या लोकांना माहित होते की रक्त सांडावं लागेल. पण ते हिंदुस्थानी-हिंदुस्थानींचं रक्त सांडू नये.. अर्थातच त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण तेव्हा जे स्वातंत्र्य मिळालं ती भीक होती. आपल्याला खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे.’
ADVERTISEMENT
या कार्यक्रमात कंगना असंही म्हणाली की, ‘काँग्रेसची सत्ता असताना मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जेव्हा मी राष्ट्रवाद, सैन्य सुधारणा आणि माझ्या संस्कृतीचा प्रचार करते तेव्हा लोक म्हणतात की, मी भाजपचा अजेंडा चालवत आहे. खरं तर हा मुद्दा भाजपचा अजेंडा का असावा.. हा तर देशाचा अजेंडा असला पाहिजे.’
ADVERTISEMENT
कंगनाला पद्मश्री पुरस्कार प्रदान
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला आहे. कंगना हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिचे चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत. पण अनेकांनी तिला जोरदार ट्रोल देखील केलं आहे.
‘2024 साली देखील नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील’
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कंगनाने असा दावा केला होता की, 2024 साली देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होतील.
‘2014 साली नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर 2019 मध्ये भाजपची पुन्हा सत्ता आली आणि पंतप्रधान पदी मोदींची दुसऱ्यांदा वर्णी लागली. तर आता 2024 मध्ये पुन्हा मोदीच पंतप्रधान बनणार.’ असं अभिनेत्री कंगणा राणावतने म्हटलं होतं.
सचिन वाझेंचं सत्य बाहेर आलं तर ठाकरे सरकार पडेल- कंगना राणौत
कंगना विरुद्ध ठाकरे सरकार
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर कंगना राणौतने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यामुळे कंगना विरुद्ध ठाकरे सरकार असं चित्र उभं राहिलं होतं. यावेळी कंगनाने मुख्यमंत्री ठाकरे आणि त्यांच्या सरकारबाबत अत्यंत वादग्रस्त विधानं केली होती.
याचदरम्यान, कंगनाच्या मुंबईतील ऑफिसवर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. ज्यामध्ये तिच्या ऑफिसमधील काही भाग हा पाडून टाकण्यात आला होता. या सगळ्या प्रकारामुळे कंगना ही सातत्याने शिवसेनेवर हल्ला चढवत होती. त्यामुळे कंगना भाजपची कार्यकर्ती आहे अशीही तिच्यावर सातत्याने टीका करण्यात येत होती.
मात्र, आता यावेळी कंगनाने थेट देशाच्या स्वातंत्र्यासंबंधीच वादग्रस्त टीका केली आहे. अशावेळी कंगनाच्या या वक्तव्याबाबत भाजप नेते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT