तेजस्वी यादवांसोबत काय झाली खलबतं? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
आज महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बिहारमध्ये जाऊन तेजस्वी यादव यांची भेट घेतली. आज सकाळपासूनच या भेटीची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत राजदसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. त्यानंतर तेजस्वी यादव यांना जाऊन आदित्य ठाकरेंनी भेटणं हे महत्त्वाचं मानलं जातं आहे. बिहार दौरा करणारे […]
ADVERTISEMENT
आज महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बिहारमध्ये जाऊन तेजस्वी यादव यांची भेट घेतली. आज सकाळपासूनच या भेटीची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत राजदसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. त्यानंतर तेजस्वी यादव यांना जाऊन आदित्य ठाकरेंनी भेटणं हे महत्त्वाचं मानलं जातं आहे.
ADVERTISEMENT
बिहार दौरा करणारे आदित्य ठाकरे पहिलेच
आदित्य ठाकरे हे पहिले असे ठाकरे आहेत ज्यांनी बिहारचा दौरा केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीत काय होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. या दोघांची भेट झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हटलं आहे आदित्य ठाकरे यांनी?
आज मी तेजस्वी यादव यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. आमचे कौटुंबिक संबंध खूप सलोख्याचे आहेत.आमच्या भेटीमध्ये कुठलंही राजकारण आणू नका. आम्ही एकमेकांशी राजकारण सोडून चर्चा केली. या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. मी तेजस्वी यादव यांना मुंबईत येण्याचं निमंत्रण दिलं आहे. तर त्यांनीही मला पुढच्या वेळी इथे दोन ते तीन दिवसांसाठी येण्याचं आमंत्रण दिलं आहे. इथलं फॉरेस्ट असेल किंवा पर्यटनाची इतर ठिकाणं असतील तिथे ते मला घेऊन जाणार आहेत असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. आजची आमची चर्चा राजकारणावर नव्हती असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं तसंच या भेटी गाठी यापुढेही होत राहतील असंही स्पष्ट केलं.
हे वाचलं का?
तेजस्वी यादव काय म्हणाले?
देशाचं संविधान धोक्यात आहे, ते वाचवण्यासाठी जे काही शक्य असेल ते आम्ही करणार आहोत.असं वक्तव्य तेजस्वी यादव यांनी केलं. तसंच आम्ही एकमेकांचे राजकीय हितचिंतक असल्याचंही त्यांनी सांगितलं.
भाजपविषयी काय म्हणाले आदित्य ठाकरे?
ज्यांनी पीडीपीसोबत युती केली त्यांनी आमच्यावर टीका करण्याची गरज नाही. ज्याच्या विरोधात भाषणं केली त्यांच्यासोबत जाऊन बसले अशांनी आम्हाला काहीही शिकवू नये असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपला टोला लगावला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT