Inside Story: गृहमंत्री वळसे-पाटील आणि CM ठाकरेंमध्ये नेमकं काय बिनसलंय?
मुंबई: भाजप नेत्यांवर शिवसेनेला हव्या त्या पद्धतीने कारवाया होत नसल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात गृहमंत्री पदावरुन बिनसलं असल्याची चर्चा आहे. या सगळ्यातच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. या चर्चेला संजय राऊत देखील हजर होते. यावेळी या बैठकीत नेमकं काय घडलं या बैठकीतील Inside Story आता आम्ही आपल्याला सांगणार आहोत. […]
ADVERTISEMENT

मुंबई: भाजप नेत्यांवर शिवसेनेला हव्या त्या पद्धतीने कारवाया होत नसल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात गृहमंत्री पदावरुन बिनसलं असल्याची चर्चा आहे. या सगळ्यातच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. या चर्चेला संजय राऊत देखील हजर होते. यावेळी या बैठकीत नेमकं काय घडलं या बैठकीतील Inside Story आता आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री यांच्यात काही तरी बिनसलं असल्याची जी चर्चा आहे सुरु त्यावर पडदा टाकणं हेच सरकारसाठी आवश्यक आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि संजय राऊत यांची जी बैठक होती ती बैठक संपलेली आहे. दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे की, अशा पद्धतीच्या सरसकट कारवाया आम्ही करु शकत नाही. पोलीस खात्याला काही बंधनं आहेत. कायद्याचे काही बंधन आहेत. त्यामुळे अशाप्रकारची सरसकट कारवाई होऊ शकत नाही.
तूर्तास तरी गृह खात्याच्या बाबतीतला वाद हा मुख्यमंत्र्यांनी स्वत: अधिकृतरित्या प्रेस रिलीज काढून संपविण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या वेळेस हे प्रेस रिलीज निघालं तेव्हा दिलीप वळसे-पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या समोर बसले होते आणि तातडीने ते प्रेस रिलीज काढण्यात आलं. त्यामुळे सध्या तरी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न हा मुख्यमंत्र्यांकडून देखील होत आहे.
वळसे पाटील यांच्यावर मुख्यमंत्री नाराज असं वृत्त समोर आल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. पाहा नेमकं काय म्हटलं आहे.









