नवाब मलिकांच्या नव्या आरोपांबाबत काय म्हटलं आहे NCB ने?
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा NCB वर गंभीर आरोप केले आहेत. भाजप नेत्याच्या मेहुण्याला सोडण्यात आलं.तसंच जे आयोजक होते त्यांनाही सोडून देण्यात आलं मग इतरांनाच का पकडण्यात आलं? ज्यांना ताब्यात घेऊन सोडण्यात आलं त्याचे आदेश कुणी दिले होते? असे प्रश्न उपस्थित केले. तसंच NCB ची कारवाई हा सगळा बनाव असल्याचंही म्हटलं […]
ADVERTISEMENT
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा NCB वर गंभीर आरोप केले आहेत. भाजप नेत्याच्या मेहुण्याला सोडण्यात आलं.तसंच जे आयोजक होते त्यांनाही सोडून देण्यात आलं मग इतरांनाच का पकडण्यात आलं? ज्यांना ताब्यात घेऊन सोडण्यात आलं त्याचे आदेश कुणी दिले होते? असे प्रश्न उपस्थित केले. तसंच NCB ची कारवाई हा सगळा बनाव असल्याचंही म्हटलं आहे. त्याबाबत आता NCB ने पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे NCB ने?
2 ऑक्टोबरला जी पार्टी होणार होती त्याची माहिती आम्हाला मिळाली म्हणून आम्ही छापे मारले. एका विशिष्ट माहितीच्या आधारे आम्हाला हे कळलं की कॉर्डिलिया नावाच्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी होणार आहे. या प्रकरणी आठ जणांना चरस, कोकेन, MDA यांसारखे ड्रग्ज समाविष्ट होते त्यासहीत अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 33 हजार रूपयेही जप्त करण्यात आले.
हे वाचलं का?
Drugs Case : नवाब मलिक यांच्या आरोपांना भाजपच्या मनिष भानुशालींनी दिलं उत्तर, म्हणाले..
या सगळ्या प्रकरणी NCB ला काही साक्षीदार समाविष्ट करायचे असतात. त्यामुळे अशा साक्षीदारांचं बॅकग्राऊंड काय आहे ते शोधायला आम्हाला वेळ नसतो. एकूण नऊ साक्षीदार या प्रकरणात होते. ज्यामधले दोघे जण हे मनिष भानुशाली आणि के. पी. गोसावी हेदेखील होते. या सगळ्यांना 2 तारखेच्या आधी आम्ही ओळखत नव्हतो.
ADVERTISEMENT
या छाप्या दरम्यान ज्यांना अटक करण्यात आली त्यांची सुरक्षितताही महत्त्वाची होती. कारण त्या ठिकाणी गर्दी झाली होती काही कॅमेरेही त्या ठिकाणी होते. त्या सगळ्याची खबरदारी होते त्यांना NCB कार्यालयात आणण्यात आलं. त्यानंतर त्यांच्याशी NCB च्या अधिकाऱ्यांनी योग्य व्यवहार केला. एकूण 14 जणांना NCB कार्यालयात आणण्यात आलं. त्यांची तपासणी झाली. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. 14 पैकी आठ जणांच्या विरोधात पुराव्यांच्या आधारे कारवाई करण्यात आली. त्यांना अटक करण्यात आली. ज्यांच्या विरोधात पुरावे नव्हते त्यांना सोडून देण्यात आलं. पंचनामा हा आम्ही जागेवर तयार करतो. विविध ठिकाणी होणारे पंचनामे आणि त्यांच्या वेळा वेगळ्या असतात. येत्या काळात जे पुरावे आम्हाला मिळाले आहेत ते आम्ही कोर्टात सादर करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ज्या लोकांना अटक करण्यात आली त्यांना आधी एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर ती चार दिवस वाढवण्यात आली. त्यानंतर या आठही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. माननीय कोर्टाने उर्वरित दहा लोकांच्या विरोधात पोलीस कोठडी मान्य केली आहे. कोठडीत असताना आरोपींनी केलेले खुलासे आणि जबाब यानंतर सहा इतर मोहिमा राबवल्या त्यामध्ये या दहा जणांना अटक करण्यात आली. या सगळ्यामागे एक मोठं नेटवर्क आहे हे आमच्या लक्षात आलं आहे. या सगळ्या ऱॅकेटचा पर्दाफाश आम्ही करू. NCB च्या विरोधात कऱण्यात आलेले सगळे आरोप बिनबुडाचे आहेत. जे आरोप आमच्यावर करण्यात आले आहेत त्यांना काहीही अर्थही नाही. ते कुठल्यातरी आकसापोटी कऱण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT