Muslim Brotherhood : राहुल गांधींनी RSS ची तुलना केलेली मुस्लिम ब्रदरहूड काय आहे?
What is Muslim Brotherhood : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी यांनी आरएसएसवर सडकून टीका केली आहे. भारतात लोकशाहीचा मार्ग पुर्णपणे बदलला आहे, यामागचे कारण आरएसएस (RSS) संघटना आहे. आरएसएस ही कट्टरवादी आणि फॅसिस्ट संघटना असल्याचे सांगत त्यांनी त्याची तुलना मुस्लिम ब्रदरहूडशी केली. दरम्यान ही मुस्लिम ब्रदरहूड […]
ADVERTISEMENT

What is Muslim Brotherhood : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी यांनी आरएसएसवर सडकून टीका केली आहे. भारतात लोकशाहीचा मार्ग पुर्णपणे बदलला आहे, यामागचे कारण आरएसएस (RSS) संघटना आहे. आरएसएस ही कट्टरवादी आणि फॅसिस्ट संघटना असल्याचे सांगत त्यांनी त्याची तुलना मुस्लिम ब्रदरहूडशी केली. दरम्यान ही मुस्लिम ब्रदरहूड (Muslim Brotherhood) संघटना नेमकी आहे तरी काय? आणि या संघटनेला अनेक देशात आतंकी संघनटना का मानले जाते? हे जाणून घेऊयात. (what is muslim brotherhood that rahul gandhi is comparing rss in london)
RSS मुस्लिम ब्रदरहूडसारखी कट्टरपंथी संघटना, राहुल गांधींचा पुन्हा हल्ला
मुस्लिम ब्रदरहूड म्हणजे काय?
मुस्लिम ब्रदरहूड (Muslim Brotherhood) ही इजिप्तमधली सर्वांत मोठी इस्लामी संघटना आहे. या संघटनेला इख्वान अल-मुस्लमीन नावाने देखील ओळखले जाते. या संघटनेची स्थापना १९२८ साली हसन अस बन्नाने केली होती. अरब देशात या संघटनेवर आतंकवादी कारवायांना समर्थन देण्याचे आरोप होतात. तसेच अल कायदाला मुस्लिम ब्रदरहूडचा आतंकी चेहरा देखील मानले जाते. अमेरीकेतल्या 9/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेन ही या संघटनेचा सदस्य होता.
संघटनेचा राजकिय प्रवेश
या संघटनेने अनेक देशात इस्लामिक चळवळीवर खुप प्रभाव पाडला. तसेच मध्य पुर्वेतील देशात त्याचे अनेक सदस्य आहेत. सुरूवातीला या संघटनेचा मुळ उद्देश्य नैतिक मुल्य रूजवण्याचा आणि चांगल्या कामाचा प्रचार प्रसार करने हा होता. मात्र पुढे जाऊन ही संघटना राजकारणाकडे वळली.